त्र्यंबकेश्वरला शिव जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 18:50 IST2021-02-04T18:49:37+5:302021-02-04T18:50:22+5:30
त्र्यंबकेश्वर : येथे शिवजन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वरला शिव जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
त्र्यंबकेश्वर : येथे शिवजन्मोत्सव सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी तालुका व शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यावेळी शिव जन्मोत्सव सोहळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष करून प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करून प्रत्येक कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा तसेच सॅनिटायझरचा, मास्कचा वापर करण्यात येईल. मिरवणूक आपापसात अंतर ठेवून काढण्यात येईल.
यावेळी जाहीर केलेली कार्यकारिणी शिवजन्मोत्सव समिती : तालुकाध्यक्ष - समाधान सकाळे, कार्याध्यक्ष -शिवाजी कसबे, उपाध्यक्ष - दिलीप मुळाणेल, खजिनदार - रवी वारुणसे, सरचिटणीस - समाधान आहेर, शहराध्यक्ष - स्वप्नील शेलार, कार्याध्यक्ष - बंडु खाडे, खजिनदार - रवींद्र (बाळा) सोनवणे, उपाध्यक्ष अजय अडसरे आदींची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.