लासलगाव येथे विविध कार्यक्रम
By Admin | Updated: April 15, 2016 00:03 IST2016-04-14T23:48:16+5:302016-04-15T00:03:53+5:30
लासलगाव येथे विविध कार्यक्रम

लासलगाव येथे विविध कार्यक्रम
लासलगाव : येथील विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्र माच्या सुरु वातीला डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी १२५ व्या जयंतीनिमित्त १५० डझन वह्या व पेनांचे वाटप करून ज्ञानदिन म्हणून साजरा करण्यात आला. रमाई मंडळाच्या वतीने भीमवंदना घेण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लासलगावच्या सरपंच संगीता शेजवळ, प्रकाश पाटील, राजेंद्र चाफेकर, डॉ. विकास चांदर, डॉ. विलास कांगणे, शंतनु पाटील, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सानप, मधुकर गावडे, किशोर बंदछोडे, रामनाथ शेजवळ यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दौलतराव गायकवाड, प्रल्हाद निरभवणे, साहेबराव केदारे, नाना बंदछोडे, सुशीला शेजवळ, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल ब्रह्मेचा, गुलशन मन्सुरी, राणी शहा, रोहिणी मोरे, ग्रामसेवक सी. के. मुंढे, तलाठी गांगुर्डे, डॉ. उषा बंदछोडे, धीरज झाल्टे, समिती अध्यक्ष सागर आहिरे. शहजाद पठाण, सुधाकर शेजवळ, मुकेश शेजवळ, अनिल शेजवळ, मनोहर आहिरे, गोरख अढांगळे उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल शेजवळ यांनी केले. विलास खैरनार यांनी आभार मानले.