‘डॉक्टर्स डे’निमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:11 IST2019-07-03T22:10:51+5:302019-07-03T22:11:30+5:30
लासलगाव : ‘डॉक्टर्स डे’ निमित्त वॉक विथ डॉक्टर्स ही अनोखी संकल्पना राबवित लासलगाव येथे जयदत्त होळकर मित्रमंडळातर्फे वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने डॉक्टर्स उपस्थित होते.

‘डॉक्टर्स डे’निमित्त विविध कार्यक्रम
लासलगाव : ‘डॉक्टर्स डे’ निमित्त वॉक विथ डॉक्टर्स ही अनोखी संकल्पना राबवित लासलगाव येथे जयदत्त होळकर मित्रमंडळातर्फे वृक्षारोपण व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने डॉक्टर्स उपस्थित होते.
येथील जयदत्त होळकर मित्रमंडळाने मागील वर्षापासून ‘डॉक्टर्स डे’निमित्त डॉक्टरांकरिता विविध उपक्र म सुरू केले आहेत. यावर्षी भल्या पहाटे विंचूर वाइन पार्कयेथे वॉक विथ डॉक्टर्स याकरिता मोठ्या संख्येने डॉक्टर सहभागी झाले होते. डॉक्टर्स व जयदत्त होळकर मित्रमंडळाच्या सदस्यांनी यावेळी मिसळ पार्टीचा आनंदही घेतला.
जयदत्त होळकर मित्रमंडळाच्या वतीने शहरात झाडे लावा, जतन करा व बक्षीस मिळवा ही संकल्पना राबविण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर डॉक्टर डे दिनाचे औचित्य साधून डॉक्टरांच्या हातून विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. ज्येष्ठ नागरीक भवन परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. लासलगाव ग्रामपंचायत हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास लासलगावचे उपसरपंच जयदत्त होळकर, गुणवंत होळकर, डॉ. अरुण काळे, डॉ. सुरेश गायकर, डॉ. श्रीनिवास दायमा, डॉ. मनोज ठोके, डॉ. विकास चांदर, डॉ. अमोल शेजवळ, डॉ. मनोज ठोके, डॉ. विलास कांगणे, डॉ. अमोल धांडे, डॉ. अनिल बोराडे, डॉ. अनिल ठाकरे, डॉ. चारुदत्त अहिरे, डॉ. सोनल सोनवणे, डॉ. प्रवीण डुंगरवाल, डॉ. कैलास पाटील, डॉ. श्रीकांत आवारे, डॉ. सुजित गुंजाळ, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. रूपेश गांगुर्डे, डॉ. प्रणव माठा, डॉ. अशोक महाले, डॉ. योगेश चौधरी, डॉ. चांडक, डॉ. संगीता सुरशे, डॉ. उषा बंदछोडे यांच्यासह संतोष ब्रह्मेचा, दिनेश जाधव मयूर बोरा उपस्थित होते.