महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:08 AM2018-03-10T00:08:07+5:302018-03-10T00:08:07+5:30

नाशिक : जिल्ह्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यासह विविध उपक्रम राबविण्यात आले.

Various programs in the district for women's day | महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

महिला दिनानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम

googlenewsNext
ठळक मुद्दे महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलादेशात मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक

नाशिक : जिल्ह्यात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यासह विविध उपक्रम राबविण्यात आले. सिन्नर येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळाच्या माध्यमिक विभाग व इंग्रजी विभागात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष अण्णासाहेब गडाख होते. व्यासपीठावर रघुनाथ एरंडे, माधव शिंदे, शिवाजी गाडेकर, विलास सातपुते आदी उपस्थित होते. यावेळी संजीवनी गजभार, चंद्रकला साळुंखे, पुष्पा जाधव, गीतांजली भवर, शीतल उशीर, प्रियंका देवकर, रोहिणी तुपे, वैशाली कोळपे, तब्बसुम शेख, मोनाली कुलकर्णी, सुवर्णा सातपुते, वर्षा खैरनार आदी महिलांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रासह देशात मुलींचे घटते प्रमाण चिंताजनक आहे. स्त्रीभ्रूण हत्या ही गंभीर समस्या आहे, हे प्रकार थांबले पाहिजेत असे प्रियंका देवकर यांनी व्यक्त केले. प्रवीण सोमवंशी यांनी सूत्रसंचालन केले. सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात महिलांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सरपंच सीमा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकला कांगणे, ग्रामपंचायत सदस्य अनिता आव्हाड, पी. बी. थोरात, एम. पी. शिरसाठ, एस. ओ. सोनवणे, शारदा सरवार आदी उपस्थित होते. यावेळी व्ही. एस. कवडे, एस. पी. शिरसाठ, एस. ओ. सोनवणे, पी. बी. थोरात आदींनी महिला दिन का व केव्हापासून साजरा करता व कसा साजरा करावा याच्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. भोर विद्यालयाच्या वतीने सरपंच सीमा शिंदे, शिवगौरी कृषिसेवा केंद्राच्या संचालक चंद्रकला कांगणे व ग्रामपंचायत सदस्य अनिता आव्हाड यांचा विद्यालयाच्या वतीने ेसत्कार करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख पी. बी. थोरात यांनी उपस्थित महिलादिनावर आधारित ‘होतीस तू’ ही कविता सादर केली. पी. बी. थोरात यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Various programs in the district for women's day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.