‘श्री श्रीं’च्या उपस्थितीत शहरात आज विविध कार्यक्रम

By Admin | Updated: January 13, 2015 00:29 IST2015-01-13T00:29:31+5:302015-01-13T00:29:55+5:30

‘श्री श्रीं’च्या उपस्थितीत शहरात आज विविध कार्यक्रम

Various programs in the city today in the presence of 'Shri Shree' | ‘श्री श्रीं’च्या उपस्थितीत शहरात आज विविध कार्यक्रम

‘श्री श्रीं’च्या उपस्थितीत शहरात आज विविध कार्यक्रम

नाशिक : आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत उद्या (दि. १३) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘वेणुनाद’ या विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी श्री श्री रविशंकर सोमवारी नाशकात दाखल झाले. उद्या (दि.१३) सकाळी ७ वाजता आसारामबापू पुलाजवळच्या सुयोजित विरिडीयन व्हॅली येथे महारुद्र पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. नकारात्मक विचार जाऊन चैतन्यमय वातावरण निर्माण होण्यासाठी ही पूजा होणार आहे. कार्यक्रमात बंगळुरूच्या वेदविज्ञान महाविद्यापीठातील अकरा वेदशास्त्री पंडितही सहभागी होणार आहेत. यानंतर ‘श्री श्रीं’च्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता हॉटेल ‘एक्स्प्रेस इन’मध्ये फक्त निमंत्रितांसाठी ‘कॉर्पोरेट मीट’ होणार आहे. सायंकाळी ४ वाजता मखमलाबाद नाका येथील महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन ‘श्री श्रीं’च्या हस्ते होईल. सायंकाळी ६ वाजता गंगापूर नाका येथील चोपडा लॉन्स येथे प्रशिक्षक व स्वयंसेवकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. १४) श्री श्री रविशंकर हे बंगळुरूकडे प्रस्थान करतील. (प्रतिनिधी)

Web Title: Various programs in the city today in the presence of 'Shri Shree'