शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शहरात घरफोडीसह चोरीच्या विविध घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:43 IST

शहरात घरफोडीच्या तसेच चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, चोरट्यांनी गाडीमधून ६० हजारांची रोकड तसेच पेठरोडवर एका बंगल्यातून महागड्या साड्या, लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे़

नाशिक : शहरात घरफोडीच्या तसेच चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, चोरट्यांनी गाडीमधून ६० हजारांची रोकड तसेच पेठरोडवर एका बंगल्यातून महागड्या साड्या, लॅपटॉप चोरून नेल्याची घटना घडली आहे़ याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़  मालेगाव स्टॅण्डवरील पालिजा पेट्रोलपंपावरील पंक्चरच्या दुकानासमोर उभ्या असलेल्या गाडीमधून चोरट्यांनी ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी येथील संदीप जाधव यांनीपेट्रोलपंपावरील पंक्चरच्या दुकानासमोर गाडी उभी केली होती़ चोरट्यांनी या गाडीतील काळ्या रंगाच्या रेक्झिनच्या बॅगेतून ६० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  टेलरिंग दुकानाचे शटर तोडून चोरट्यांनी ४१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना पेठरोड परिसरात घडली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी काळे (दुर्गानगर, पेठरोड) यांचे पेठरोडवर रेणुका लेडीज वेअर अ‍ॅण्ड टेलरिंगचे दुकान आहे़ १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश केला़ तसेच दुकानातील १५ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, २६ हजार रुपयांच्या महागड्या साड्या असा ४१  हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी म्हसरूळ पोलीस  ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़आरटीओ कार्यालयाजवळील अश्वमेघनगरमधील रहिवासी सचिन चौले यांचा महागडा मोबाइल चोरट्यांनी आकाश पेट्रोलपंपाच्या मागे असलेल्या जगदंबा मोबाइल शॉपीतून चोरून नेल्याची घटना घडली़ या प्रकरणी  म्हसरूळ पोलीस ठाण्यात  चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयCrime Newsगुन्हेगारी