सुरक्षा सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:33 IST2020-01-11T23:25:31+5:302020-01-12T01:33:04+5:30
चांदवड : येथे रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आरटीओ इन्स्पेक्टर संदीप निमसे यांनी शहरांमध्ये वेगवेगळे ...

चांदवडला रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त ट्रॅक्टरवर रिफ्लेक्टर लावताना परिवहन अधिकारी संदीप निमसे, डॉ. आत्माराम कुंभार्डे, चंद्रकांत व्यवहारे, प्रवीण हेडा, सचिन राऊत, विलास ढोमसे आदी.
चांदवड : येथे रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला. यावेळी प्रादेशिक परिवहन विभागातर्फे आरटीओ इन्स्पेक्टर संदीप निमसे यांनी शहरांमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले. यामध्ये श्री नेमिनाथ जैन गुरुकुल कॉलेज व उषाराणी होळकर विद्यालय चांदवड येथील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन वाहतूक नियम वाहतूक चिन्ह इशारे याबाबत मार्गदर्शन केले. हेल्मेट, सीट बेल्ट सक्तीचे फायदे काय याबाबत प्रबोधन करण्यात आले.
रस्त्यावरील अपघात व त्यापासून आपले जीवनमान कसे वाचविता येईल, हेल्मेटमुळे आजपर्यंत कोण कोण कसे बचावले याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकरीवर्गातदेखील आपल्या वाहनांना रिफ्लेक्टर लावल्याने काय फायदा होईल याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी संदीप निमसे यांनी शंभरहून अधिक ट्रॅक्टरला रिफ्लेक्टर लावले. शुभारंभप्रसंगी डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या हस्ते रिफ्लेक्टर लावून उद्घाटन करण्यात आले. तसेच चांदवड शहरामध्ये हेल्मेटसक्तीचा कार्यक्र म मोटारसायकल रॅली काढून करण्यात आली. यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन राठोड यांच्या हातून झेंडा दाखवून काढण्यात आली. पोलीस निरीक्षक व संबंधित पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते. पेट्रोलपंप मालेगाव - मनमाड चौफुली -गणूर चौफुलीमार्गे सांगता करण्यात आली.
सोमवारीपेठ - श्रीराम रोड - रंग महाल - शिंपी गल्ली - जैन मंदिर - नगर परिषद कार्यालय - उर्दू शाळा - गाडगेबाबा चौक ते गणुर चौफुली कॉलेज रोड - भैरवनाथ हॉटेल येथे सांगता करण्यात आली. या कार्यक्र मासाठी अश्वमेध सेवाभावी बहुउद्देशीय संस्था चांदवड यांच्या पुढाकाराने सर्व कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडून श्री संदीप निमसे यांच्या प्रमुख पुढाकाराने या कार्यक्र माची रूपरेषा आखण्यात आली होती. यामुळे चांदवड शहराबरोबरच संपूर्ण तालुक्याला वाहन चालविताना घेतली जाणारी काळजी मार्गदर्शन व प्रसारण करण्यात आले. या कार्यक्र माच्या वेळी सचिन राऊत, मुकेश कोकणे, अमोल कोतवाल, दयानंद गोखले, संदीप खैरनार, संकेत अग्रवाल, भूषण कासलीवाल यांचे स्वीय सहाय्यक नितीन फंगाळ, प्रतीक काटकर, दत्तात्रय बारगळ आदी उपस्थित होते.