ऑलिम्पिक सप्ताहांतर्गत वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:11 IST2021-06-28T04:11:20+5:302021-06-28T04:11:20+5:30

रविवारी (दि.२७) दिंडोरी रोड येथील चामर लेणे परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वृक्षारोपणात खेळाडू, क्रीडा ...

Various events, including tree planting during the Olympic weekend | ऑलिम्पिक सप्ताहांतर्गत वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम

ऑलिम्पिक सप्ताहांतर्गत वृक्षारोपणासह विविध कार्यक्रम

रविवारी (दि.२७) दिंडोरी रोड येथील चामर लेणे परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वृक्षारोपणात खेळाडू, क्रीडा संघटक, प्रशिक्षक, पालक यांनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जनलक्ष्मी बँकेचे संचालक शरद गांगुर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. दि. २९ जून रोजी तलवारबाजी या खेळासंबंधी ऑनलाइन सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती तलवारबाजीचे प्रशिक्षक राजू शिंदे आणि या सेमिनारचे प्रमुख अविनाश ढोली यांनी दिली.

या संस्थांच्या वतीने क्रीडा सप्ताहांतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण बुधवार दिनांक ३० जून रोजी सायंकाळी ४ वाजता कालिकादेवी मंदिर हॉलमध्ये संपन्न होणार आहे.

Web Title: Various events, including tree planting during the Olympic weekend