बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम
By Admin | Updated: May 10, 2017 01:00 IST2017-05-10T01:00:33+5:302017-05-10T01:00:45+5:30
पाथर्डी फाटा : भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस अर्थात बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरात विविध सांस्कृतिक तसेच धम्म कार्याचे आयोजन करण्यात आले आहे.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज शहरात विविध कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथर्डी फाटा : भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिवस अर्थात बुद्ध पौर्णिमेनिमित्त शहरात विविध सांस्कृतिक तसेच धम्म कार्याचे आयोजन करण्यात आले आहे. पांडवलेणी येथील बुद्ध स्मारकात कार्यक्रम होणार आहेत. उपासकांना दिवसभर या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. संयोजक भन्ते सुगत यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी १० वाजता धम्म ध्वजारोहणाने कार्यक्रमांचा प्रारंभ होईल. त्यानंतर स्मारकात भिक्खू संघाच्या वतीने बौद्ध पूजा पाठ होईल. साडेदहा वाजता रक्तदान शिबिर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. दुपारी स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. १२ वाजता भिक्खू संघास भोजनदान दिले जाईल. दुपारी ४ वाजता शालिमार येथील डॉ. आंबेडकर पुतळ्यापासून भगवान बुद्धांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. एमजी रोड, सीबीएस, त्र्यंबक नाका, सातपूर, स्वारबाबानगर, त्रिमूर्ती चौक, पाथर्डीफाटा मार्गे मिरवणूक बुद्ध स्मारकात येणार असून, तेथे मिरवणुकीचा समारोप होईल. सायंकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यान धम्म सभा, नंतर रूपेश निकाळजे प्रस्तुत क्र ांतीचा साक्षीदार हे महानाट्य सादर केले जाणार आहे. याशिवाय उपनगरांमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त बुद्ध स्मारकास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बुद्ध वंदनेसाठी येणाऱ्या उपासकांसाठी महापालिकेच्या वतीने विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विविध सामाजिक संघटनांचे स्टॉल्स् लावण्यात येणार आहे.