महावीर जयंतीनिमित्त विविध उपक्रम
By Admin | Updated: April 10, 2017 00:54 IST2017-04-10T00:54:18+5:302017-04-10T00:54:38+5:30
येवला : येथे भगवान महावीर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली

महावीर जयंतीनिमित्त विविध उपक्रम
येवला : येथे भगवान महावीर यांची जयंती विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली. येथील जैन मंदिरात भगवान महावीरांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला. समाजबांधवांच्या वतीने चांदीच्या सजवलेल्या पालखीतून महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. पटणीगल्ली, शिंपीगल्ली, मेनरोड सराफ फाटा, बालाजीगल्ली, नगरपालिका रोडमार्गे मिरवणूक नेण्यात आली. मिरवणुकीदरम्यान ‘त्रिशलानंदन वीर की जय, बोलो महावीर की जय आज का दिन कैसा है सोने से भी महेंगा है, वंदे वीरम, जय बोलो महावीर भगवान स्वामी की जय’चा जयघोष करण्यात आला. मिरवणूक मार्गात भाविकांनी विविध रांगोळ्या काढल्या होत्या. अनेक ठिकाणी फुलांच्या वर्षावात पालखीचे स्वागत करण्यात आले. अनेक महिलांनी पालखीचे पूजन (गऊळी) केले. जैन मंदिरात विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. शेखर पटणी यांनी प्रास्ताविक केले. निराली पटणी, दर्शन पटणी, हार्दिक पटणी, परम पटणी, हेत्वी पटणी, रिपल पटणी, देशना लोढा, प्रियल पटणी आदि विद्यार्थ्यांनी महावीर भगवान यांच्या जीवनावर भाषणे केली. धनंजय कुलकर्णी, विजय श्रीश्रीमाळ, दत्ता महाले यांचीही भाषणे झाली. त्यांनी सांगितले की, भगवान महावीर यांचे तत्त्वज्ञान आणि आदर्शावर जगाची नौका चालू असून, महावीरांनी दिलेली त्रिसूत्री आणि अनेकांदवादाचे तत्त्वज्ञान जगाला उपयुक्त ठरत असे सांगून कर्मसिद्धांताची महती विशद केली.
हेत्वी पटणी, निराली पटणी, राज्वी पटणी, परम पटणी, निमश्व पटणी, जिनांग पटणी, हिरल पटणी यांनी भगवान महावीरांच्या भक्तिगीतावर सुंदर नृत्य सादर केले.
ओस्तवाल जैन स्थानकात येवला जैन समाजाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या जन्मोत्सवनिमित्य समरथगच्छधिपती प. पू. १००८ उत्तमचंदजी म. सा. आणि प. पू. विमलकंवरजी म.सा. यांच्या शिष्या प. पू. दर्शनाजी म.सा. आदिंनी आपल्या मधुर वाणीतून महावीरांची महती विशद केली.
मिरवणुकीत मारवाडी गुजराथी मंचचे अध्यक्ष अल्केश कासलीवाल, ओस्तवाल समाज अध्यक्ष विजयकुमार श्रीश्रीमाळ, उपनगराध्यक्ष सुरज पटणी सुभाष समदडिया, गुलाबराव महाले, मनोज कासलीवाल, पवन पहाडे, राजेश भंडारी, धनंजय कुलकर्णी, अनिल मंडलेचा, सतीश समदडिया, अभय पटणी, अमित पटणी, शेखर मेहता, मनीष काबरा, सतीश समदडिया, अमित पटणी, दत्ता महाले, प्रितम पटणी, प्रवीण श्रीश्रीमाळ, अभय पटणी, अनिल मुथा, अनिल मंडलेचा, विलास पटणी, सतीश पटणी रोशन भंडारी मदन चंडालिया, सुरेश पटणी, सुरेश बंब, हर्षल पारख, सुभाष लोढा, रवींद्र बाफना, स्नेहल पटणी, सुहास पटणी, जगदीश पटणी, पोपटलाल पटणी, सचिन कासलीवाल यांच्यासह जैन व जैनेत्तर बांधव महिला युवक-युवती उपस्थित होते. गोतमी प्रसादीचे आयोजन करण्यात आले होते.
इगतपुरी येथे महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील खालची पेठ येथील जैनस्थानकापासून महावीरांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. वरची पेठ येथील जैनस्थानक येथे मिरवणुकीचा समारोप झाला. शहरातील खालची पेठ येथून मेनरोड, तीनलकडी, बालाजी मंदिरपासून काढलेल्या मिरवणुकीत अहिंसा परमोधर्म:, जय जिनेंद्र यासह त्रिशलानंदन वीर की जय बोलो, महावीर की जय या जयघोषांनी परिसर दुमदुमन गेला होता. वरची पेठ येथील जैनस्थानकात मुख्य कार्यक्रम झाला. चिमुकल्यांनी गीते सादर केली. यावेळी महावीरांच्या जीवनचरित्रावर व्याख्यान झाले.
इगतपुरी जैन बांधवाच्या वतीने चिंचलै खैरे या आदिवासी भागात सर्वरोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण ७५ रुग्णांनी सहभाग घेतला. रविवारी वरची पेठ येथील जैनस्थानकात रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ५१ महिला व पुरुष रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी संघपती प्रकाश टाटिया, मनसुखलाल लुणावत, सुभाष लुणावत, पोपटशेठ लुणावत, प्रकाश छाजेड, पुरणचंद लुणावत, सुरेश चोपडा, अशोक लुणावत, मोहनलाल बाफना, अजित पारख, शांतिलाल लुणावत, पूनमचंद बाफणा, अजित लुणावत, शांतीलाल संचेती, संदीप लुणावत, अजित बाफणा, राजेश मेहता, मोहनलाल चोरडिया, अजय लुणावत, डॉ. सचिन मुथा, हितेश चोरडिया, नरेंद्र सेठी, संजय चोपडा, प्रकाश मुथा, अभय लुणावत, अभय भन्साळी, सुरेश छाजेड, रमेश समदडिया, संजय बाठिया, बाळूशेठ समदडिया, सुभाष समदडिया, हुकूमचंद श्रीश्रीमाळ, संदीप कोचर, योगेश लुणावत, संतोष बाफना, राजेश जैन, योगेश चोपडा, आशिष चोरडिया, संतोष टाक आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी येथील जैनस्थानकात भगवान महावीर जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. महेश श्रीश्रीमाळ यांनी सूत्रसंचालन केले. (लोकमत चमू)