शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून लवकरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 16:59 IST

नाशिक : कोविड आजारासाठी उपचारादरम्यान आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल व तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान ...

ठळक मुद्देआरोग्य विज्ञान विद्यापीठाचावर्धापन दिन साधेपणाने साजराआरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल व तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता

नाशिक : कोविड आजारासाठी उपचारादरम्यान आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल व तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून लवकरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्र म सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. विद्यापीठाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी सर्वांना आॅनलाइन शुभेच्छा दिल्या.विद्यापीठातील ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर उपस्थित होते. कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र झाला असून, या आपत्कालीन परिस्थितीत काम करणारे सर्व डॉक्टर, प्राध्यापक, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. अशा परिस्थितीत रु ग्णालयात सेवा पुरविताना तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या दृष्टिकोनातून विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या आदेशान्वये विद्यापीठाकडून विविध प्रमाणपत्र अभ्यासक्र मास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल व वैद्यकीय तज्ज्ञांची समिती यांच्या समितीने पुढील प्रमाणपत्र अभ्यासक्र म आरेखित केले आहेत. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्टिफिकेट कोर्स इन आॅपरेशन थेटर टेक्नॉलॉजी, सर्टिफिकेट कोर्स इन रेडिओ टेक्नॉलॉजी, सर्टिफिकेट कोर्स इपिडेमिक मॅनेजमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन डायलिसिस, सर्टिफिकेट कोर्स इन ईसीजी, सर्टिफिकेट कोर्स इन कॅथलॅब हे तांत्रिक अभ्यासक्र म सुरू करण्यात येणार असून, सर्टिफिकेट कोर्स इन पंचकर्म, सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेद नर्सिंग, सर्टिफिकेट कोर्स इन डेंटल मेकॅनिक आदी एक किंवा दोन वर्ष कालावधीचे अभ्यासक्र म सुरू करण्यात येणार आहेत, असेही कुलगुरुंनी नमूद केले. 

टॅग्स :universityविद्यापीठHealthआरोग्यdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या