विविध उपक्रम : मोठा राजवाडा येथून मोटारसायकल रॅली; सभेचे आयोेजन

By Admin | Updated: March 3, 2015 00:44 IST2015-03-03T00:43:59+5:302015-03-03T00:44:12+5:30

काळाराम मंदिर सत्याग्रहाला उजाळा

Various activities: motorcycle rally from big Rajwada; Iojean of the meeting | विविध उपक्रम : मोठा राजवाडा येथून मोटारसायकल रॅली; सभेचे आयोेजन

विविध उपक्रम : मोठा राजवाडा येथून मोटारसायकल रॅली; सभेचे आयोेजन

नाशिक : नाशिक मुक्कामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काळाराम मंदिर सत्याग्रहाची हाक दिली आणि २ मार्च १९३० रोजी सत्याग्रह करण्याची तारीख निश्चित करण्यात आली. या सत्याग्रहामध्ये दादासाहेब गायकवाड, केशव अवर्धेकर, शंकर गायकवाड या नाशिककरांचा सहभाग होता.
या आठवणींना उजाळा देण्यासाठी शहर परिसरात विविध दलित संघटनांच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काळाराम मंदिराबाहेरील शिलालेख, मोठा राजवाडा, तसेच शिवाजी रोडवरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेकांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मोठा राजवाडा येथून सकाळच्या सुमारास मोटारसायल रॅली काढण्यात आली. भीमशक्ती संघटना रिपाइं, भारतीय बहुजन महासंघ, तसेच इतर अनेक संघटनांनी डॉ. आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केले. त्याचप्रमाणे नाशिकरोड येथील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात आले. सकाळी अनेक संघटनांनी आंबेडकर पुतळ्यावर दर्शनासाठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Various activities: motorcycle rally from big Rajwada; Iojean of the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.