वर्धमान शिक्षण संस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:40 IST2021-02-20T04:40:33+5:302021-02-20T04:40:33+5:30

----------–--–----------------------------- चिंचावडला रक्तदान चिंचावड : येथे शिवजन्मोत्सव निमित्ताने शिवबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर झाले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ...

Vardhman Shikshan Sanstha | वर्धमान शिक्षण संस्था

वर्धमान शिक्षण संस्था

----------–--–-----------------------------

चिंचावडला रक्तदान

चिंचावड : येथे शिवजन्मोत्सव निमित्ताने शिवबा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर झाले. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उपसरपंच किरण पाटील, नीलेश जाधव, मनिष खैरनार, गोरख बच्छाव, ज्ञानेश्वर भामरे, गोरख गांगुर्डे, निवृती देवरे, देवमन पवार, समाधान गुंजाळ, भिला बच्छाव, दिनेश पवार उपस्थित होते. गोरख मोरे, काशीनाथ मोरे, योगेश देवरे, समाधान देवरे, साहेबराव देवरे, दादाजी पवार, निवृती सूर्यवंशी, अनिल भामरे आदी एकशे एक तरुणांनी रक्तदान केले.

--------------------------------

एलव्हीएच विद्यालय मांजरे

मालेगाव: तालुक्यातील मांजरे येथील एल. व्ही. एच. माध्यमिक विद्यालयात शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. एस. मोरे होते. मुख्याध्यापक मोरे यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक आर. वी. पाटील व जे. एस. याळीस यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक जे. एस. याळीस यांनी केले. आभार प्रदर्शन एस. डी. आहेर यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Vardhman Shikshan Sanstha