वणीत व्हॉल्व्ह गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया
By Admin | Updated: July 12, 2014 00:28 IST2014-07-11T22:18:59+5:302014-07-12T00:28:10+5:30
वणीत व्हॉल्व्ह गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

वणीत व्हॉल्व्ह गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया
वणी : येथील संखेश्वर मंदिराजवळील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ५६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या एअर व्हॉल्व्हमधून हजारो लिटर पाण्याची गळती सुरू आहे.
चांदवड तालुक्याच्या ५६ गाव पाणीपुरवठा योजनेचे पाणी जलवाहिनीद्वारे ओझरखेड धरणातून उचलण्यात येते. ओझरखेड धरण-वणी-एखरुखा फाटा अशा वीस किलोमीटरच्या जलवाहिनीतून एकरुखा फाटा येथील जलकुंभात पाणीसाठा करण्यात येतो व तेथून पुढे चांदवड तालुक्यातील गावांना पाणी वितरित करण्यात येते. एकीकडे राज्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसत असून, थेंब थेंब पाणी वाचविण्याचे व पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचा सल्ला प्रशासकीय पातळीवरून दिला जात असताना त्याचे कोणतेही गांभीर्य संबंधितांच्या गावी दिसत नसून गेल्या तीन आठवड्यापासून पाण्याचा अपव्य सुरू असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिल्याने पाण्याचे मूल्य मातीमोल ठरविणाऱ्या घटकांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.