वणीत महिलादिनी रंगले स्रेहसंमेलन

By Admin | Updated: March 10, 2017 01:10 IST2017-03-10T01:10:28+5:302017-03-10T01:10:41+5:30

वणी : स्वाभिमान, सन्मान, समर्पण हेच महिलांचे दागिने असून, या गुणांसह महिलांचा सन्मान राखावा, असे आवाहन बोरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र बोरा यांनी केले

Vanitya MahatmaDindi Palele Shereh Sammelan | वणीत महिलादिनी रंगले स्रेहसंमेलन

वणीत महिलादिनी रंगले स्रेहसंमेलन

वणी : स्वाभिमान, सन्मान, समर्पण हेच महिलांचे दागिने असून, या गुणांसह महिलांचा सन्मान राखावा, असे आवाहन बोरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र बोरा यांनी केले. महिला दिनानिमित्त बोरा एज्युकेशन सोसायटीतील कार्यक्रमात ते बोलत होते.
शिक्षण, आरोग्य, समाजातील स्थान, जबाबदारी, कर्तव्य याबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात केलेली प्रगती तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात मिरविलेला मान याबाबत निमंत्रित महिलांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला. दरम्यानच्या कालावधीत विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा केल्या होत्या. या निमित्त महिलांचे स्रेहसंमेलन झाले. यावेळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले.
प्रातिनिधिक स्वरूपात महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मदर तेरेसा, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले अशा विविध प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना कर्तृत्वाना उजाळा देण्यात आला. परिसरातील महिलांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Vanitya MahatmaDindi Palele Shereh Sammelan