नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माणिकखांब येथे सरपंच अंजना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीत वनिता चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.माणकिखांब येथे आवर्तन पद्धतीनुसार पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीत उपसरपंचपदासाठी वनिता चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे सरपंच अंजना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनिता यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामअधिकारी समाधान सोनवणे यांनी काम पाहीले.यावेळी मनसेचे उपतालुका प्रमुख भोलेनाथ चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य शाम चव्हाण, अशोक पगारे, सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित उपसरपंच वनिता चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर ग्रामस्थांनी गुलाल उधळून व फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.याप्रसंगी माजी उपसरपंच भिमाबाई चव्हाण, ललीत संजय भटाटे, वर्षा म्हसणे, भारत भटाटे, विष्णु चव्हाण, प्रल्हाद भटाटे, बाळासाहेब चव्हाण, संतोष चव्हाण, रमेश चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, काशीनाथ ठमके, वसंत चव्हाण, संजय चव्हाण, कृष्णा चव्हाण, गोविंद चव्हाण, तुकाराम चव्हाण, भारत चव्हाण, हिरामण चव्हाण, भागीरथ भटाटे, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
माणिकखांब उपसरपंचपदी वनिता चव्हाण बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 16:25 IST
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या माणिकखांब येथे सरपंच अंजना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणूकीत वनिता चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माणिकखांब उपसरपंचपदी वनिता चव्हाण बिनविरोध
ठळक मुद्देफटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा