वणीत कांदा भावात घसरण
By Admin | Updated: February 17, 2016 22:46 IST2016-02-17T22:45:59+5:302016-02-17T22:46:27+5:30
वणीत कांदा भावात घसरण

वणीत कांदा भावात घसरण
वणी : येथील उपबाजारात आज तीनशे वाहनांमधून चार हजार
पाचशे क्विंटल कांद्याची आवक झाली. कमाल ९३० रु पये, किमान ५००, तर सरासरी ६५० रु पये क्विंटल दराने कांदा खरेदी-विक्र ीचे व्यवहार पार पडले.
परराज्याबरोबर पुणे जिल्ह्यात नवीन कांद्याची आवक सुरू झाल्याने कांदा दरात घसरण सुरूच असून, दराबाबतच्या अस्थिरतेचे वातावरण उत्पादकांची चिंता वाढविणारे आहे.सद्यस्थितीत व्यापारी बिहार, कोलकता, आसाम, उत्तर प्रदेश या ठिकाणी कांदा पाठवितात. दरम्यान, मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थान या तीन राज्यांमध्ये सध्या नवीन कांदा बाजारपेठेत येत असून, पुणे जिल्ह्यातही नवीन कांदा मोठ्या प्रमाणावर विक्र ीसाठी येऊ लागला आहे. त्यात नवीन कांद्याचे आकारमान तुलनात्मक मोठे असल्याने परदेशात या कांद्याला चांगली मागणी आहे तसेच देशांतर्गत बाजारपेठा या कांद्याने काबीज केल्याने त्याचा फटका अप्रत्यक्ष स्थानिक ठिकाणी बसल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली. दरम्यान दिंडोरी, कळवण, चांदवड भागातील उत्पादकांनी कांदे विक्रीसाठी उपबाजारात आणले होते. मात्र अपेक्षित दर न मिळाल्याने उत्पादकांमधे अस्वस्थतेचे वातावरण आहे. (वार्ताहर)