सतगुरू फाउंडेशन चा ‘वंदे मातरम’ कार्यक्रम

By Admin | Updated: April 24, 2016 10:13 IST2016-04-22T23:34:18+5:302016-04-24T10:13:47+5:30

सतगुरू फाउंडेशन यांच्यातर्फे ‘वंदे मातरम’ या कार्यक्रमाचे शनिवार (दि.२३) महाकवी कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी साडेसहा वाजता आयोजन करण्यात आले आहे.

'Vande Mataram' program of Satguru Foundation | सतगुरू फाउंडेशन चा ‘वंदे मातरम’ कार्यक्रम

सतगुरू फाउंडेशन चा ‘वंदे मातरम’ कार्यक्रम

नाशिक : प्रत्येकाच्या मनात देशाबद्दल आत्मियता निर्माण व्हावी, मातृभूमीबद्दल प्रेम निर्माण व्हावे यासाठी सतगुरू फाउंडेशन यांच्यातर्फे ‘वंदे मातरम’ या कार्यक्रमाचे शनिवार (दि.२३) महाकवी कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी साडेसहा वाजता आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या युवा पिढीच्या तरुण मनांना चेतविणारे राष्ट्रीयत्व आणि देशाभिमान जागविणाच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सद्गुरू ब्रह्मेशानंदचार्य स्वामी महाराज (गोवा) यांचे युवकांना मार्गदर्शन लाभणार असल्याची माहिती सतगुरू फाउंडेशन यांच्यातर्फे देण्यात आली. ‘वंदे मातरम्’ या कार्यक्रमाअंतर्गत विविध क्षेत्रांतील मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे तसेच रविवार (दि. २४) शंकराचार्य न्यास कुर्तकोटी सभागृहात गायत्री उपदेश सोहळ्याचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी दीपक गावस, अनूप शेलार, सुवर्णा कोठावदे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Vande Mataram' program of Satguru Foundation