विंचूर ग्रामपालिकेच्या सरपंचपदी वंदना कानडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 18:59 IST2019-11-30T18:58:33+5:302019-11-30T18:59:36+5:30
विंचूर : येथील ग्रामपालिकेच्या सरपंचपदी वंदना राजेंद्र कानडे यांची निवड झाली. संगीता सोनवणे आणि वंदना कानडे यांच्यात सरपंचपदासाठी रस्सीखेच होऊन कानडे ह्या एका मताने विजयी झाल्या. निवडणुकीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला.

सरपंचपदी वंदना राजेंद्र कानडे
विंचूर : येथील ग्रामपालिकेच्या सरपंचपदी वंदना राजेंद्र कानडे यांची निवड झाली. संगीता सोनवणे आणि वंदना कानडे यांच्यात सरपंचपदासाठी रस्सीखेच होऊन कानडे ह्या एका मताने विजयी झाल्या. निवडणुकीनंतर समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला.
शनिवारी (ीद.३०) दुपारी ग्रामपालिकेच्या कार्यालयात सरपंचपद निवडणुकीसाठी विशेष बैठक बोलविण्यात आली होती. सरपंचपद सर्वसाधारण स्त्री राखीव असल्याने सरपंचपदासाठी वंदना राजेंद्र कानडे व संगीता जगन सोनवणे या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
माघारीच्या वेळी कोणीही माघार न घेतल्याने अखेर उपस्थित १७ ग्रामपालिका सदस्यांनी मतदान प्रक्रि येत सहभाग घेतला. वंदना कानडे यांना नऊ तर संगीता सोनवणे यांना आठ मते मिळाली. कानडे यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.
याप्रसंगी धनाजी पवार, सुनीता पवार, वैशाली जेऊघाले, मधुकर दरेकर, ताराबाई क्षीरसागर, भास्कर परदेशी, नंदिनी क्षीरसागर, रिहाना मोमीन, प्रकाश मोरे, आत्माराम दरेकर, उषा राऊत, नीरज भट्टड, अविनाश दुसाने, नानासाहेब जेऊघाले, अंजुम शेख, ग्रामविकास अधिकारी जी. टी. खैरनार, बाळासाहेब चव्हाण तसेच ग्रामपालिका कर्मचारी उपस्थित होते.