शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वनमहोत्सव : ‘हरित नाशिक’साठी एकत्र आले शेकडो हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 17:18 IST

निमित्त होते, वनमंत्रालयाकडून मागील दोन वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या वनमहोत्सवाचे. यावर्षी तिस-या टप्प्यात १३ कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट वन मंत्रालयाने ठेवले आहे. वनविभागासह अन्य शासकीय, निमशासकीय संस्थांनीही पुढाकार घेत ठिकठिकाणी रोपांची लागवड करीत वनमहोत्सव साजरा केला.

ठळक मुद्दे वनविभागाच्या जिल्ह्यातील ७० रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मितीएकूण १२३.२५ लाख रोपांची उपलब्धता करून देण्यात आली खोदलेल्या ४९ हजार ५०० खड्ड्यांमध्ये रोपांची लागवड या महिन्यात पूर्ण केली जाणार

नाशिक : तपमानवाढीचे गडद होणारे संकट, हवामान व ऋ तू बदलाची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी वृक्षलागवड-संवर्धनाचा एकमेव पर्याय असल्याचे जागतिक स्तरावर मान्य करण्यात आले आहे. राज्यात वनांचे आच्छादन वाढविण्याच्या उद्देशाने वृक्षारोपणाचे महत्त्व ओळखून ‘वनमहोत्सव’ हा वन मंत्रालयाने महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.१) शहराला हिरवाईचे कोंदण प्राप्त करून देण्यासाठी शेकडो नाशिककरांचे हात एकत्र आले.

निमित्त होते, मंत्रालयाकडून मागील दोन वर्षांपासून राबविल्या जाणाऱ्या वनमहोत्सवाचे. यावर्षी तिस-या टप्प्यात १३ कोटी रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट वन मंत्रालयाने ठेवले आहे. वनविभागासह अन्य शासकीय, निमशासकीय संस्थांनीही पुढाकार घेत ठिकठिकाणी रोपांची लागवड करीत वनमहोत्सव साजरा केला. वनविभागाने ४७ लाख ६० हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती मिळून १५ लाख आणि अन्य शासकीय संस्थांनी साडेनऊ लाख रोपांची लागवड करावयाची आहे. जिल्ह्यात एकूण ७२ लाख २६ हजार रोपांच्या लागवडीचे ध्येय आहे. वनविभागाकडून एक हजार रोपांची लागवड करून शुभारंभ मौजे धोंडेगाव-देवरगाव शिवारात करण्यात आला. त्रिपक्षीय करारानुसार पश्चिम वनविभागांतर्गत सॅमसोनाईट व तैनवाला फाउंडेशनच्या वतीने धोंडेगाव-देवरगाव शिवारातील डोंगरांवर ४९ हजार ५०० रोपांची लागवड करण्याचे निश्चित झाले आहे. शहरासह जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने वनविभागाने एक हजार रोपे पहिल्या टप्प्यात लावून शुभारंभ केला. याप्रसंगी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, मुख्य वनसंरक्षक एस. रामाराव, वनसंरक्षक (वन्यजीव), एन. आर. प्रवीण, उपवनसंरक्षक डॉ. शिवाबाला एस. आदी उपस्थित होते. खोदलेल्या ४९ हजार ५०० खड्ड्यांमध्ये रोपांची लागवड या महिन्यात पूर्ण केली जाणार असल्याचे वनमहोत्सवाच्या नाशिक जिल्हा समन्वयक उपवनसंरक्षक टी. ब्यूला एलील मती यांनी सांगितले.

‘या’ प्रजातींची लागवडवनमहोत्सवासाठी जिल्ह्याला रोपांचा पुरवठा व्हावा, या उद्देशाने वनविभागाच्या जिल्ह्यातील ७० रोपवाटिकांमध्ये रोपे निर्मिती करण्यात आली. एकूण १२३.२५ लाख रोपांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने कडुलिंब, शिरस, बाभूळ, शिसम, खैर, शिसू, करंज, साग, अंजन, वावळा, आपटा, खाया, आंबा, चिंच, जांभूळ, सीताफळ, वड, पिंपळ, उंबर, आवळा, बेहडा, हिरडा, रिठा, अर्जुनसादडा, कवठ, ब्रह्मानंद या प्रजातींचा समावेश आहे. वनमहोत्सवांतर्गत या भारतीय प्रजातीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागNashikनाशिकenvironmentवातावरण