गणेशोत्सवाचा खर्च टाळून वैकुंठरथ, रुग्णवाहिका
By Admin | Updated: September 28, 2015 22:53 IST2015-09-28T22:52:32+5:302015-09-28T22:53:20+5:30
गणेशोत्सवाचा खर्च टाळून वैकुंठरथ, रुग्णवाहिका

गणेशोत्सवाचा खर्च टाळून वैकुंठरथ, रुग्णवाहिका
इंदिरानगर : गणेशोत्सवातील झगमगाटासाठी होणारा खर्च टाळून परिसरातील नागरिकांना गरजेची अशी व्यवस्था करून देण्यासाठी संघर्ष सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार हा खर्च वैकुंठरथ आणि रुग्णवाहिकेवर करण्यात आला आहे.
सार्वजनिक उत्सवासाठी खर्च अधिक असतो. मंडप, मूर्तीची खरेदी, मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा यासाठी बराच खर्च येतो. संघर्ष सेवाभावी संस्थेने स्थानिक नागरिकांच्या मदतीने खर्च करून उत्सव साजरे केले. यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरविण्यात आले आणि सर्व खर्चास फाटा देऊन रुग्णवाहिका आणि वैकुंठरथ तयार करण्यात आला आहे.