वैभव - सर्वतीर्थ टाकेद येथील जटायू मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:21+5:302021-09-24T04:17:21+5:30
-कसे जायचे नाशिकवरून इगतपुरी-घोटीमाग्रे टाकेदचे अंतर ४८ किमी आहे. प्रथम घोटीपर्यंत जाऊन त्यानंतर सिन्नर रस्त्याने पिंपळगावमार्गे आधारवड गावातून टाकेदकडे ...

वैभव - सर्वतीर्थ टाकेद येथील जटायू मंदिर
-कसे जायचे
नाशिकवरून इगतपुरी-घोटीमाग्रे टाकेदचे अंतर ४८ किमी आहे. प्रथम घोटीपर्यंत जाऊन त्यानंतर सिन्नर रस्त्याने पिंपळगावमार्गे आधारवड गावातून टाकेदकडे जाता येते. घोटीपर्यंत जाण्यापूर्वी वाडीवऱ्हे व गोंदे या दोन गावांच्या मध्येच महामार्गावर लेकबिल फाटा लागतो. या रस्त्याने साकूरमार्गे कवडदरा रस्त्याने टाकेद गावात पोहोचता येते. नाशिकहून भगूरमार्गेही टाकेदला जाता येते. भगूर घोटी रस्त्याने कवडदरापर्यंत जाऊन टाकेद येथे जाता येते
-काय पहायचे
नाशिकपासून जवळच असलेले टाकेद तीर्थ रामायणातील जटायू कथेमुळे पावन झाले. तिथे जटायूची मोठी मूर्ती आणि एक मंदिर उभारलेले आहे. ज्या ठिकाणी रामचंद्रांनी बाण मारल्यानंतर पाणी निघाले तिथे आता एक कुंड बांधण्यात आले आहे. त्याला सर्वतीर्थ असे म्हणतात. आड-औंढा-पट्टा-बितिंगा या दुर्गम अशा किल्ल्यांनी व्यापलेला हा सारा प्रदेश आहे. टाकेदपासून ४५ ते ४५ किलोमीटर अंतरावर भंडारदरा पर्यटन स्थळ आहे. रतनगड-भंडारदरा या सहलीमध्ये सुद्धा टाकेदला भेट देता येईल. जटायूचा संघर्ष आणि त्याचे प्राणोत्क्रमण जिथे झाले ते जटायू मंदिर दुर्मीळ असे आहे.
230921\23nsk_51_23092021_13.jpg
जटायू मंदीर, सर्वतीर्थ टाकेद