वडाळीभोई ते आळंदी पायी दिंडी सोहळा

By Admin | Updated: November 26, 2015 23:43 IST2015-11-26T23:42:59+5:302015-11-26T23:43:35+5:30

वडाळीभोई ते आळंदी पायी दिंडी सोहळा

Vadali Bhoi from Dandi to Alandi | वडाळीभोई ते आळंदी पायी दिंडी सोहळा

वडाळीभोई ते आळंदी पायी दिंडी सोहळा


सोग्रस : वडाळीभोई ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन शुक्रवार, दि. २७ ते मंगळवार, दि. ८ डिसेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती दिंडीचालक माधव अहेर, अशोक जाधव, परशराम जाधव यांनी दिली.
हा दिंडी सोहळा शुक्रवार, दि. २७ रोजी वडाळीभोई येथून निघून सोनेवाडी, खडांगळी, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, पेठ,
चाकण मार्गे आळंदी येथे
मंगळवार, दि. ८ डिसेंबर रोजी पोहोचेल. याप्रसंगी नामदेव महाराज वडजकर यांचे कीर्तन व पुंडलिक महाराज मोहिते यांचे कीर्तन
होईल. हा दिंडी सोहळा आळंदी देवाची येथील कृष्णमंदिर नामदेव महाराज वडजकर मठ, देवाची आळंदी येथे थांबणार आहे.
या सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भागवत धर्म सेवा मंडळ, माळवस्ती युवा ग्रुप, ग्रामस्थ वडाळीभोई यांनी केले
आहे. (वार्ताहर )

Web Title: Vadali Bhoi from Dandi to Alandi