शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ कारणावरून वडाळा चौकात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:39 IST

दुचाकीला रिक्षाचा कट लागला आणि फिर्यादी मोहम्मद ओवेस कोकणी (१९)व रिक्षाचालकाची बाचाबाची झाली रिक्षाचालक तेथून निघून गेला; मात्र याचवेळी संशयित अकिल पिरमोहम्मद शेख व संशयित सराईत शौकत सुपडू शहा हे दोघे आले व त्यांनी ओवेस व त्याचा मित्र जलालला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शौकत याने फायटरने मोहम्मदची हनुवटी फोडल्याचा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देगुंडगिरी फोफावतेय संशयिताने फायटरने फोडली युवकाची हनुवटी

इंदिरानगर : दुचाकीला रिक्षाचा कट लागला आणि फिर्यादी मोहम्मद ओवेस कोकणी (१९)व रिक्षाचालकाची बाचाबाची झाली रिक्षाचालक तेथून निघून गेला; मात्र याचवेळी संशयित अकिल पिरमोहम्मद शेख व संशयित सराईत शौकत सुपडू शहा हे दोघे आले व त्यांनी ओवेस व त्याचा मित्र जलालला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शौकत याने फायटरने मोहम्मदची हनुवटी फोडल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वडाळागाव परिसरातील खंडोबा चौक हा मुख्य चौक म्हणून ओळखला जातो. या चौकापासून काही मीटरवर वडाळा पोलीस चौकी आहे; मात्र ही चौकी असून नसल्यासारखी झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी (दि.९) येथील एका हॉटेलसमोर फिर्यादी ओवेस व जलाल हे दोघे चहा पिण्यासाठी संध्याकाळी आले होते. यावेळी संशयितांनी ‘तू माझ्या बहिणीला शिवीगाळ का केली’? असा प्रश्न उपस्थित करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बंटी याने रिंगपाणा व शौकतने फायटरचा वापर करत दोघांना गंभीर जखमी केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. मोहम्मदची हनुवटी फुटल्याने रक्तबंबाळ झाला व बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. घटनेची माहिती त्याचे वडील ओवेस यांना समजताच ते म्हशीच्या गोठ्यावरून तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी जखमी अवस्थेत मुलाला उचलून खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ज्या रिक्षाचालकासोबत वाद झाला तो एका संशयिताचा दाजी असल्याचे समजते. या घटनेवरून पुन्हा गुन्हेगारी घटनांनी वडाळागावात डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. संशयित शौकतवर यापूर्वीदेखील गुन्हे दाखल आहे. तसेच बंटी शेख याची पार्श्वभूमीदेखील गुन्हेगारी स्वरूपाची आहे.गुन्हा दाखलया दोघा सराईत गुन्हेगारांवर यापूर्वी विविध प्रकरचे गुन्हे इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी संशयितांविरुद्ध गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.पोलीस चौकीत ‘अर्थ’पूर्ण व्यवहारवडाळा पोलीस चौकी नावालाच उरली आहे. चौकीचे कु लूप अल्पवेळ उघडते. या चौकीत तक्रारींचा निपटारा कमी अन् ‘अर्थ’पूर्ण व्यवहार अधिक होत असल्याचे नागरिकांनी बोलून दाखविले. वडाळा पोलीस चौकीचे सक्षमीकरण करणे गरजेचे असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय