येवल्यात लसीअभावी लसीकरण ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:24 IST2021-05-05T04:24:37+5:302021-05-05T04:24:37+5:30

तालुक्यात आजपर्यंत १७२ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४२६१ झाली असून यापैकी ३६८८ बाधित कोरोनामुक्त ...

Vaccination stopped in Yeola due to lack of vaccine | येवल्यात लसीअभावी लसीकरण ठप्प

येवल्यात लसीअभावी लसीकरण ठप्प

तालुक्यात आजपर्यंत १७२ बाधितांचा कोरोनाने बळी गेला आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४२६१ झाली असून यापैकी ३६८८ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. तर सद्य:स्थितीत अ‍ॅक्टिव्ह (बाधित) रुग्णसंख्या ४०१ इतकी आहे.

तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह नगरसूल ग्रामीण रुग्णालय, शहरातील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना लसीकरण केले जाते. आतापर्यंत २० हजार १२० लोकांचे लसीकरण झाले आहे. हे प्रमाण अवघे दहा टक्के इतके आहे. मात्र, सद्य:स्थितीत लस उपलब्ध नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण ठप्प झालेले आहे. शहरासह तालुक्यातील ४५ वर्षांपुढील ९५ हजार ९१७ तर १८ ते ४४ वयोगटातील १ लाख ३३ हजार १४० असे एकूण २ लाख २९ हजार ५७ लोकांना लसीकरण करण्याचे आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे.

आरोग्य विभागाने शहरात वाॅर्ड क्रमांक १ ते ४ मध्ये कोरोना चाचणी मोहीम सुरू केली असून शहरातील सर्वच वाॅर्डांत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

Web Title: Vaccination stopped in Yeola due to lack of vaccine