राजापूर येथे लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:38 IST2021-04-27T20:23:04+5:302021-04-28T00:38:48+5:30
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (दि. २७) सकाळी दहा ते पाच या वेळेत कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.

राजापूर येथे लसीकरणाला सुरुवात
राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी (दि. २७) सकाळी दहा ते पाच या वेळेत कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. ४५ वर्षांपुढील नागरिकांना लसीकरण करण्यात येत आहे.
राजापूर येथे पहिल्यांदाच लसीकरण सुरुवात झाले असल्याने नागरिकांनी खबरदारी घेत व फिजिकल डिस्टन्सिंग पाळत लसीकरणाला प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी तोंडाला मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करत सुरक्षित अंतर ठेवून लसीकरणासाठी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याची माहिती राजापूर प्राथमिक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय सालपुरे, डॉ. काजल ठेंगील यांनी दिली. यावेळी सरपंच नलिनी मुंडे, उपसरपंच सुभाष वाघ, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर दराडे, प्रकाश वाघ, विजय ठाकरे, दामू सोनवणे, नामदेव पवार, शरद आगवण, दत्ता सानप, सचिन जाधव, आण्णासाहेब मुंढे, ग्रामविकास अधिकारी आर. एस. मंडलिक
आदी उपस्थित होते.