मंगळवारी केवळ पंचवटी कारंजा येथे असलेल्या मनपा इंदिरा गांधी रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होते तर अन्य ठिकाणी असलेल्या मायको दवाखाना, तपोवन, नांदूर, मखमलाबाद, हिरावाडी कालिका नगर, म्हसरूळ, लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहीम ठप्प झाली होती. बुधवारच्या दिवशी लस साठा उपलब्ध झाल्याने पंचवटीत असलेल्या सर्व केंद्रांवर ४५ वयोगटाच्या पुढील नागरिकांचे लसीकरण सुरू होते तर इंदिरा गांधी रुग्णालयात केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात होते. महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांना लस न मिळाल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. इंदिरा गांधी रुग्णालय वगळता अन्य सर्व केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाल्याने ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय झाली नाही.
पंचवटीत सर्व केंद्रांवर लसीकरण सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:15 IST