दीड महिन्याच्या बालकांसाठी लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 00:43 IST2021-07-14T00:06:42+5:302021-07-14T00:43:46+5:30
सोयगाव : मालेगाव महानगरातील बालकांना न्यूमोनिया व इतर न्यूमोकोकल आजारांपासून संरक्षण होण्यासाठी १२ जुलैपासून दीड महिन्याच्या बालकांना लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

दीड महिन्याच्या बालकांसाठी लसीकरण
ठळक मुद्देगरसेविका आशा अहिरे यांच्या उपस्थितीत मोफत देण्यास सुरुवात
सोयगाव : मालेगाव महानगरातील बालकांना न्यूमोनिया व इतर न्यूमोकोकल आजारांपासून संरक्षण होण्यासाठी १२ जुलैपासून दीड महिन्याच्या बालकांना लस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.
न्यूमोकोकल काँजू गेट नावाची लस नगरसेविका आशा अहिरे यांच्या उपस्थितीत मोफत देण्यास सुरुवात झाली. शहरातील महिलांनी आपल्या दीड महिन्याच्या बालकास ही लस द्यावी. बालकांना दुर्धर आजारांपासून दूर करावे, असे आवाहन नगरसेविका अहिरे यांनी केले आहे.