कृषी सेवा केंद्रचालकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:12 IST2021-05-30T04:12:29+5:302021-05-30T04:12:29+5:30
कृषी केंद्रचालकांचा नेहमीच शेतकरी आणि इतर घटकांशी जवळून संबंध येत असल्याने कोरोना संसर्गाचा या चालकांना, तेथील कामगार आणि त्यांच्या ...

कृषी सेवा केंद्रचालकांचे लसीकरण
कृषी केंद्रचालकांचा नेहमीच शेतकरी आणि इतर घटकांशी जवळून संबंध येत असल्याने कोरोना संसर्गाचा या चालकांना, तेथील कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना धोका आहे. त्यामुळे त्यांचे तातडीने प्रतिबंधक लसीकरण व्हावे, अशी मागणी सिन्नर ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे तालुकाध्यक्ष अरुण शेळके यांनी तालुका कृषी अधिकारी कैलास भदाणे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन शुक्रवारी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रचालकांना, तेथील कामगारांना शहरातील वाजे विद्यालय येथे कोविशिल्ड या लसीचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, लसीकरण नोडल अधिकारी डाॅ. वैभव गरुड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी कैलास भदाणे, नगरपालिकेचे लिपिक विजय वाजे, ॲग्रो डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण शेळके, संचालक दत्तात्रय सोनवणे, अंबादास वाघ, रामहरी चकोर, संपत घुगे, राजाराम काकड, गोविंद पालवे, भाऊसाहेब खाडे, रामदास कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.
फोटो : २९ सिन्नर कृषी
सिन्नर येथे कृषी विक्रेत्यांचा लसीकरणप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी कैलास भदाणे, ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण शेळके आदी.
===Photopath===
290521\29nsk_6_29052021_13.jpg
===Caption===
फोटो : २९सिन्नर कृषी सिन्नर येथे कृषी विक्रेत्यांचा लसीकरणप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन बच्छाव, पंचायत समितीचे कृषी अधिकारी कैलास भदाणे, ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण शेळके आदी.