शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सुट्टीच्या काळात व्हॉट्सअ‍ॅप, ई-मेल्सद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 21:40 IST

नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी प्राथमिक व माध्यमिक आस्थापनांवरील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या काळात शाळांना सुट्टी असली तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहील यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, मॅसेजेस, ई-मेल्स, इंटरनेट, मोबाइल, फोन आदी माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांशी संपर्कात राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे शहरातील सर्व शाळा बंद शिपाई, कामाठी नियमित काम करण्याचे आदेश

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानंतर नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानेही महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी प्राथमिक व माध्यमिक आस्थापनांवरील शाळा ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, या काळात शाळांना सुट्टी असली तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहील यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, मॅसेजेस, ई-मेल्स, इंटरनेट, मोबाइल, फोन आदी माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांशी संपर्कात राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत.राज्य सरकारने राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १९८७ दि. १३ मार्च २०२० पासून लागू केल्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने कोरोना विषाणूचा होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील सर्व सरकारी, खासगी, प्राथमिक व माध्यमिक शाळा यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था ३१ मार्च २०२० पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक शहर परिसरातील महापालिके च्या ९० प्राथमिक व १३ माध्यमिक शाळांसह खासगी अनुदानित व विनाअनुदानित १७२ अशा एकूण २७५ शाळा ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. परंतु, या काळात शाळा बंद राहणार असल्या तरी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू राहील यादृष्टीने व्हॉट्सअ‍ॅप, मॅसेजेस, ई-मेल्स, इंटरनेट, मोबाइल, फोन आदी माध्यमातून पालकांशी व विद्यार्थ्यांशी संपर्कात राहण्याचा सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शाळेतील शिपाई, कामाठी व सुरक्षारक्षक यांनी त्यांच्या वेळेत दररोज उपस्थित राहून नेमून देण्यात आलेले कामकाज करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करून आदेशाच्या प्रतित्युतरादाखल उलट टपालाने यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचनाही शिक्षणाधिकाºयांनी शहरातील सर्व सरकारी, खासगी, प्राथमिक व माध्यमिक आस्थापनेवरील शाळांच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. दरम्यान,  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद राहणार असल्या तरी दहावी व बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. या परीक्षेदरम्यान, आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाही यासाठी आवश्यक ती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने केल्या आहेत. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकSchoolशाळाStudentविद्यार्थी