शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 00:54 IST

बागलाण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कोरोनाच्या संकटकाळात पूर्णपणे खिळखिळी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील २७९ पदांपैकी तब्बल ७५ पदे रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देबागलाण तालुका : २७९ पैकी ७५ जागांना वाली नाही, आदिवासी भागासह सर्वसामान्य रुग्णांची हेळसांड; तत्काळ भरतीची मागणी

सटाणा : बागलाण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कोरोनाच्या संकटकाळात पूर्णपणे खिळखिळी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील २७९ पदांपैकी तब्बल ७५ पदे रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.बागलाण हा आदिवासीबहुल तालुका आहे. १७१ गावे असलेला हा भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक मोठा तालुका म्हणून परिचित आहे. साल्हेर- मुल्हेरसह पश्चिम भाग हा पूर्णत: आदिवासी भाग असताना तालुक्यातील आदिवासी भागासह सर्वसामान्य जनतेला प्राथमिक आरोग्यसेवा या रिक्त पदांमुळे मिळणे अवघड बनले आहे.वास्तविक बागलाणमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उभारली आहेत, तरीदेखील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सोयीसुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. तालुक्यात कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत या रिक्त पदांची भरती होणे गरजेचे असताना आरोग्य विभागाकडून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. शासनाने याचा विचार करून तत्काळ रिक्त पदांची भरती करणे आवश्यक आहे, अन्यथा कोरोनाच्या संकटकाळात सर्पदंश, मलेरिया यासह अन्य आजार बळावून जनजीवन विस्कळीत होण्याची भीती आहे.तालुक्यातील सटाणा, नामपूर, डांगसौंदाणे या तीन ठिकाणी ग्रामीण रु ग्णालयाच्या माध्यमातून तर अकरा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ५३ आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून आरोग्यसेवा दिली जात आहे. तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे त्यावर नियंत्रण असते. वैद्यकीय अधिकारी वर्गाची सर्वाधिक १२ पदे रिक्त असल्याने सर्वसामान्य जनतेला व रुग्णांना उपचारासाठी खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत असल्याने आदिवासी भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यdoctorडॉक्टर