चेहडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार
By Admin | Updated: April 3, 2017 00:52 IST2017-04-03T00:52:02+5:302017-04-03T00:52:16+5:30
निफाड : तालुक्यातील चेहडी खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात जर्सी गायीचे वासरू ठार झाल्याची घटना घडली.

चेहडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरी ठार
निफाड : तालुक्यातील चेहडी खुर्द येथे बिबट्याच्या हल्ल्यात जर्सी गायीचे वासरू ठार झाल्याची घटना घडली.
चेहडी येथे रमेश बापूराव रुमणे यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील शेडच्या बाहेर गायी, वासऱ्या बांधलेल्या होत्या. रविवारी (दि. २) पहाटे ३ च्या सुमारास बिबट्याने संधी साधत जर्सी वासराचा फडशा पाडला. ही घटना रुमणे यांच्या रविवारी सकाळी ६ च्या दरम्यान लक्षात आली. सदरची घटना येवला वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर येवला वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख, भारत माळी आदिंनी घटनास्थळी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला.
३ मार्च रोजी चेहडी येथे बिबट्याने याच घटनास्थळापासून जवळच्या अंतरावर विजय रुमणे यांच्या शेतातील शेडबाहेर बांधलेल्या दोन वासऱ्या ठार केल्या होत्या. (वार्ताहर)