वापरून कचऱ्यात फेकलेला मास्क ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 12:05 AM2021-04-14T00:05:57+5:302021-04-14T01:12:53+5:30

नाशिक : शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लाखो नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे महापालिकेची यंत्रणाही अडचणीत येत आहे. कचऱ्यातील हे मास्क सफाई कामगारांसह अन्य नागरिकांनाही संसर्गासाठी धोकादायक ठरू शकतात.

Using a mask thrown in the trash is dangerous | वापरून कचऱ्यात फेकलेला मास्क ठरतोय धोकादायक

वापरून कचऱ्यात फेकलेला मास्क ठरतोय धोकादायक

Next
ठळक मुद्देपालिकेची नष्ट करण्यासाठी तारांबळ : कामगारांसह अनेक जण बाधित होण्याची शक्यता

नाशिक : शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लाखो नागरिक मास्कचा वापर करीत असले, तरी नंतर हा मास्क थेट रस्त्यात फेकून देणे किंवा घरगुती कचऱ्यात फेकण्याचे प्रकार वाढत असून, त्यामुळे महापालिकेची यंत्रणाही अडचणीत येत आहे. कचऱ्यातील हे मास्क सफाई कामगारांसह अन्य नागरिकांनाही संसर्गासाठी धोकादायक ठरू शकतात.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने आणि आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी जी त्रिसूत्री घालून दिली आहे. त्यात मास्कचा वापर अपरिहार्य ठरला आहे. मात्र, अनेक नागरिक मास्क वापरून झाल्यानंतर ते रस्त्याच्या कडेला फेकून देतात, तसेच अनेक नागरिक घरातील कचऱ्यात टाकून देतात. त्यामुळे घंटागाडीत टाकलेला हा कचरा घरगुती कचऱ्यात मिसळला जातो. त्याला हाताळण्यातून संसर्गही होऊ शकतो.

मास्कचा वापर नागरिक करतात, ही चांगली बाब असली, तरी त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत त्यांना माहिती नाही. मास्क वेगळ्या कागदी पिशवीत दिल्यास महापालिकेच्या घंटागाडीत घातक कचऱ्यासाठी वेगळा लाल डबा असतो. त्यात टाकून तो सुरक्षित नेता येईल, परंतु नागरिक ओला-सुका कचराही वर्गीकरण करून देत नाहीत, तेथे मास्कची स्वतंत्र पिशवी कोण देणार, असा प्रश्न आहे.

नागरिकांनी वापरलेल्या मास्कची असुरक्षित पद्धतीने हाताळणी धोकादायक ठरू शकते. नागरिक मास्क घरगुती कचऱ्याच्या डब्यात टाकून दुसऱ्या दिवशी घंटागाडीत देतात. मात्र, त्याच्या हाताळणीतून घंटागाडी कामगारांना धोका निर्माण होऊ शकतो. अनेक घंटागाडी कामगारांना यापूर्वीही कोरोना संसर्ग झाला आहे. नागरिकांना मास्कची शास्त्रोक्त विल्हेवाट लावता येत नसली, तरी रस्त्यावर टाकू नये अथवा घरगुती कचऱ्यातच टाकून देऊ नये.
- डॉ. कल्पना कुटे, संचालक घनकचरा व्यवस्थापन.

दररोजच्या कचऱ्यातील मास्कचे काय?
नाशिक महापालिकेच्या वतीने पाथर्डी शिवारात असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात इन्सिनरेटर म्हणजे मोठी भट्टी आहे. महापालिकेच्या घंटागाड्यातून येणाऱ्या सहाशे टन कचऱ्यात मास्क सापडल्यानंतर, ते या भट्टीत नष्ट केले जातात. नागरिकांनी घंटागाडीत स्वतंत्र पद्धतीने मास्क दिल्यास, त्यात घातक कचऱ्यासाठी वेगळी पेटी असते. त्यात सोडियम व्हेपोराइड असते. त्यात असे मास्क टाकून नंतर ते खतप्रकल्पावरील घंटागाडीत नष्ट केले जातात.


रुग्णालयातील घातक कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट
नाशिक शहरात २००० मध्येच जैविक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी कन्नमवार पुलाजवळ प्रकल्प आहे. तेथे घातक कचरा भट्टीमध्ये विशिष्ट तापमानात टाकून नष्ट केला जातो. तर ज्या वस्तू रिसायकल होऊ शकतात, त्या तुकडे-तुकडे करून संबंधीित कारखान्यांपर्यंत पोहोचविल्या जातात. नाशिकमध्ये सुमारे वीस वर्षांपूर्वी अशा प्रकारचा जैविक कचरा निर्मूलन प्रकल्प राबविण्यात आला. आता कोरोना काळात तो उपयुक्त ठरत आहे.

६०० टन शहरात रोज निघणारा कचरा ४०० टन ओला कचरा २०० टन सुका कचरा 

Web Title: Using a mask thrown in the trash is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.