उषाताई चाटी यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 17:28 IST2017-09-01T17:28:03+5:302017-09-01T17:28:12+5:30

Ushatai Chati's bone Ramakundat immersion | उषाताई चाटी यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन

उषाताई चाटी यांच्या अस्थिंचे रामकुंडात विसर्जन


नाशिक : राष्ट्र सेवा समितीच्या तळमळीच्या कार्यकर्त्या, समितीच्या संचालिका म्हणून काम करणाºया उषाताई चाटी यांच्या अस्थींचे शुक्रावारी (दि.०१) विसर्जन करण्यात आले.
अशोकस्तंभ येथील राणी लक्ष्मी भवन येथे स्व. उषाताई चाटी यांच्या अस्थि दर्शनासाठी आणल्या होत्या. यावेळी झालेल्या शोकसभेत बोलताना निशीगंधा मोगल यांनी उषाताई यांच्या कार्याचे पैलु उलगडून दाखवले. राष्टÑ सेवा समितीच्या माध्यमातून केलेले कार्य तसेच त्यांचा जीवनप्रवास, त्यांच्या आवडी-निवडी, प्रवास, स्वभाववैशिष्ट्ये, बालसंगोपन कौशल्य याविषयी माहिती दिली. मंगलताई सैंदाणकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. सकाळी १० वाजेपासून आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी यांच्यासह अनेक नागरिकांनी उषाताई यांच्या अस्थिंचे दर्शन घेतले. अस्थिंचे रामकुंडावर विसर्जन करण्यात आले.
 

Web Title: Ushatai Chati's bone Ramakundat immersion