शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अस्थिविसर्जन करणाऱ्यांच्या शेतात उपयुक्त झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 00:23 IST

शेकडो वर्षांपासून सुरू असलेली अस्थिविसर्जनाची परंपरा बंद करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीने अनोखा उपक्र म हाती घेतला आहे. नद्यांमध्ये रक्षा विसर्जन न करता शेतात रक्षाविसर्जन करणाºया प्रत्येक कुटुंबाच्या शेतात उपयुक्त झाडे लावण्यासाठी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देसंत गाडगेबाबा स्मृतिदिनी निर्णय : प्रदूषणमुक्तीसाठी साकूर ग्रामपंचायत सरसावली

घोटी : शेकडो वर्षांपासून सुरू असलेली अस्थिविसर्जनाची परंपरा बंद करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीने अनोखा उपक्र म हाती घेतला आहे. नद्यांमध्ये रक्षा विसर्जन न करता शेतात रक्षाविसर्जन करणाºया प्रत्येक कुटुंबाच्या शेतात उपयुक्त झाडे लावण्यासाठी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे संत गाडगेबाबा स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताहातील प्रबोधनाचा अंगीकार ग्रामपंचायतीने केला आहे. आपल्या माणसांच्या स्मृती झाडांमधून जिवंत राहण्यासाठी या उपक्रमांतून प्रदूषण समस्या सुटणार आहे.इगतपुरी तालुक्यातील साकूर हे गाव अत्यंत जागरूक गाव म्हणून ओळखले जाते. नुकत्याच पार पडलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात अस्थिविसर्जन आणि प्रदूषण विषयावर कीर्तनकारांनी प्रबोधन केले. याचवेळी संत गाडगेबाबा यांचा स्मृतिदिन होता. इथले ग्रामस्थ जे चांगले आहे ते स्वीकारून अंगीकार करतात. शुक्र वारी गावातील कै. तुळसाबाई विष्णू पावसे यांच्या निधनानंतर शनिवारी त्यांच्या अस्थी आणि रक्षा विसर्जन कुठल्याही नदीत करून प्रदूषित न करण्याचा दूरगामी निर्णय त्यांच्या परिवाराने घेतला. परंपरेच्या नावाखाली प्रदूषणात भर पाडणाºया प्रथा बंद करण्यासाठी पावसे परिवाराने स्वत:च्या शेतात रक्षाविसर्जन करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. साकूर ग्रामपंचायतीकडून आज पावसे यांच्या शेतात उपयुक्त झाडांचे रोपण करण्यात आले. कै. तुळसाबाई पावसे यांच्या निधनानंतर पती विष्णू पावसे, मुलगा तथा माजी उपसरपंच बाळासाहेब पावसे, दुसरा मुलगा तथा सोसायटी संचालक सुरेश पावसे यांनी अस्थिविसर्जन नदीत न करता स्वत:च्या जमिनीत करून सर्वांसमोर आदर्श उभा केला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेला फाटा देऊन साकूरकर पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे अभिमानास्पद काम करीत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीenvironmentपर्यावरण