शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 01:28 IST

अल्पवयीन मुलांकडून शहरातील दुचाकीचोरी करून घेऊन या दुचाकींची मुंबई, ठाणे तसेच विविध शहरांमध्ये विक्री करणाऱ्या दोघा संशयितांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे़

सिडको : अल्पवयीन मुलांकडून शहरातील दुचाकीचोरी करून घेऊन या दुचाकींची मुंबई, ठाणे तसेच विविध शहरांमध्ये विक्री करणाऱ्या दोघा संशयितांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांमध्ये अक्षय बन्सीलाल सूर्यवंशी (२०, रा. नाईकवाडी, कोनगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे) व पंकज सूर्यवंशी (रा. शांतीनगर झोपडपट्टी, अंबड) यांच्यासह आणखी दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत दिली़  नखाते यांनी सांगितले की, अंबड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते़ या गुन्ह्यांच्या तपास करीत असताना त्यामध्ये दोन अल्पवयीन मुले व संशयित पंकज सूर्यवंशी याचा सहभाग असल्याचे समोर आले़ त्यानुसार या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी केली असता.  एका अल्पवयीन मुलाने ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील आपला मामा अक्षय सूर्यवंशी यास चोरीची एक दुचाकी विक्री केल्याचे सांगितले़ त्यानुसार अक्षय सूर्यवंशी यास ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन मुलांना दुचाकी व वाहने चोरी करण्यास सांगून या चोरी केलेल्या वाहनांची ठाणे व मुंबईमध्ये विक्री केल्याचे समोर आले़  या चौघा संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी नऊ दुचाकी चोरल्याची कबुली दिली़ त्यांच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़ अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, शांताराम शेळके, भास्कर मल्ले, संजीव जाधव, दत्तात्रय गवारे, चंद्रकांत गवळी, दुष्यंत जोपळे, अविनाश देवरे यांनी ही कामगिरी केली़

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी