कसबे सुकेणेला मौलाना बाबांचा उरूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 14:42 IST2017-12-09T14:42:08+5:302017-12-09T14:42:44+5:30
कसबे सुकेणे : येथील ओझर रस्त्यावर असलेल्या हजरत सय्यद मौलाना बाबांच्या उरूसनिमित्त आज हजारो मुस्लिम व हिंदू बांधव दाखल झाले आहेत. संदल मिरवणूक आणि नवस पूर्तीसाठी आज दिवसभर दर्ग्यावर गर्दी होती.

कसबे सुकेणेला मौलाना बाबांचा उरूस
कसबे सुकेणे : येथील ओझर रस्त्यावर असलेल्या हजरत सय्यद मौलाना बाबांच्या उरूसनिमित्त आज हजारो मुस्लिम व हिंदू बांधव दाखल झाले आहेत. संदल मिरवणूक आणि नवस पूर्तीसाठी आज दिवसभर दर्ग्यावर गर्दी होती.
कसबे सुकेणे येथे ओझर रस्त्यावर मौलानाबाबांचा भव्य दर्गा असून सभोवताली हिरवीगार शेती आणि अतिशय सुंदर वास्तुकलेचा नमुना असलेला हा दर्गा पूर्वाभिमुख आहे. दर्गा हा मार्बल मध्ये असून पाठीमागे उंच मिनार लक्षवेधक आहे. दर्ग्यावर रात्री केलेली विदुयत रोषणाई भाविकांचे आकर्षण आहे. याठिकाणी हजरत सय्यद मौलाना बाबा काद्री कलंदरी यांची समाधी स्थळ असून समाधीवर असलेले काचेचे झुम्बर आणि रोषणाई अतिशय विलोभनीय आहे. वर्षभर याठिकाणी नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातून मुस्लिम व हिंदू बांधव दर्शनासाठी येतात . नवसपूर्ती करतात. सालाबादप्रमाणे यंदाही उरु साला संदल मिरवणुकीने प्रारंभ झाला आहे. कसबे सुकेणे शहरातून बाबांच्या दर्ग्यावर काढण्यात येणाºया जुलूस संदलमध्ये राज्यभरातील नामवंत ढोल ताश्या पथके आणि ब्रास बॅण्ड सहभागी झाले. परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून आकाशपाळणे , दुकाने, मुस्लिम बांधवांच्या प्रार्थनेचे , पूजा प्रसादाची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली गेली आहे. ओझर- सुकेणे रस्त्यावरील वाहतूक ठप्प होऊ नये या करिता सुकेणे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.