महत्त्वपूर्ण कामे त्वरेने पूर्ण करण्याचे आदेश येवला पंचायत समितीच्या सभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा

By Admin | Updated: May 24, 2014 00:19 IST2014-05-23T17:41:49+5:302014-05-24T00:19:51+5:30

येवला - येवला पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. खातेनिहाय कामाचा आढावा घेऊन अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश सभाध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती शिवांगी पवार यांनी दिले.

Urgent work to be completed in order to discuss important issues at the Yeola Panchayat Samiti meeting | महत्त्वपूर्ण कामे त्वरेने पूर्ण करण्याचे आदेश येवला पंचायत समितीच्या सभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा

महत्त्वपूर्ण कामे त्वरेने पूर्ण करण्याचे आदेश येवला पंचायत समितीच्या सभेत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा

येवला - येवला पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. खातेनिहाय कामाचा आढावा घेऊन अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश सभाध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती शिवांगी पवार यांनी दिले.
गुरुवारी पंचायत समिती सभागृहात कृषी खात्याकडील जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या साहित्यासह, वाटप कसे झाले? याबाबतचा आढावा घेण्यात आला. प्राथमिक शाळांना मिळालेल्या सर्व बेंचेसचे वाटप समान पद्धतीने करण्याच्या सूचना, शिक्षण विभागाला देण्यात आल्या. बांधकाम विभागातील सर्वच अपूर्ण कामासंबंधाने सदस्यांनी जोरदार चर्चा करून कामाचा निपटारा तत्काळ करण्यासंबंधी जबाबदार अधिकार्‍यांना सूचना दिल्या.
कृषी, सामाजिक वनीकरण, शिक्षण, आरोग्य, लघु पाटबंधारे, ग्रामीण पाणीपुरवठा, समाजकल्याण, रोजगार हमी योजना, बालविकास प्रकल्प या सर्व विभागांतील कामकाजा संदर्भात प्रमुखांनी अहवाल वाचले. या संबंधाने पं.स. सदस्यांनी कामाचा आढावा घेतला.
सभेसाठी उपसभापती प्रकाश वाघ, पं.स. सदस्य संभाजी पवार, हरिभाऊ जगताप, रतन बोरणारे, पोपट आव्हाड, भारती सोनवणे, शंकुतला कोंदरे, जयश्री बावचे, राधाबाई कळमकर उपस्थित होते.
सहायक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी सभेचे सचिव म्हणून कामकाज पाहिले.
मागील वर्षी एकात्मिक बालविकास प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस भरती प्रक्रियेत झालेल्या गोंधळामुळे ती भरतीप्रक्रिया रद्द ठरवून नि:पक्षपातीपणे चौकशी करून मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना स्पष्ट अहवाल सादर करणार्‍या अधिकार्‍यांचे यावेळी कौतुक करण्यात आले.

Web Title: Urgent work to be completed in order to discuss important issues at the Yeola Panchayat Samiti meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.