वैजापूरसाठी पाणी सोडण्याचा आग्रह
By Admin | Updated: August 23, 2016 00:34 IST2016-08-23T00:33:51+5:302016-08-23T00:34:31+5:30
वैजापूरसाठी पाणी सोडण्याचा आग्रह

वैजापूरसाठी पाणी सोडण्याचा आग्रह
नाशिक : तीन आठवडे सलग गंगापूर धरणातून जवळपास सात टीएमसी इतके पाणी मराठवाड्याकडे झेपावलेले असतानाही औरंगाबाद जिल्ह्णातील वैजापूर येथील पाणीपुरवठा योजनांसाठी एक्स्प्रेस वे कॅनॉलद्वारे पाणी सोडण्याची मागणी औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वैजापूरच्या पाणीप्रश्नी तीन आमदारांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पाटबंधारे खात्याला पत्र देऊन भावली व मुकणे या दोन्ही धरणांमधून एक्स्प्रेस कालव्याद्वारे पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे. मुळात नाशिक जिल्ह्णात आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे एकट्या गंगापूर धरणातून जवळपास सात टीएमसी इतके पाणी मराठवाड्याला रवाना झाले तर दारणा, नांदूरमधमेश्वर मार्गेही तितकेच पाणी रवाना झाले आहे. असे असतानाही वैजापूरसाठी आत्तापासूनच पाण्याची मागणी सुरू केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मात्र जिल्ह्णातील धरणांच्या पाण्याचे आरक्षण अद्याप करण्यात आलेले नसल्याने वैजापूरसाठी पाणी कसे द्यायचे असा प्रश्न उभा ठाकल्याने त्यावर तोडगा म्हणून आता जर पाणी सोडले तर ते आॅक्टोबरमध्ये करण्यात येणाऱ्या पाणी आरक्षणातून तितके पाणी कपात करण्याचा तोडगा पुढे आला आहे. (प्रतिनिधी)