शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात युरियाची टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 23:14 IST

नााशिक : यावर्षी वेळेत पडलेला पाऊस, लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांचे बंद असलेले प्लांट आणि रेल्वेची अडचणी आदी विविध कारणांमुळे जिल्ह्णात मागीलवर्षीपेक्षा अधिक युरिया उपलब्ध होऊनही त्याची टंचाई जाणवत असून, येत्या एक दोन दिवसांत युरियाबाबतची स्थिती सुधारेल शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढ्याच गोण्या घ्याव्यात, असे आवाहन जिल्ह्णातील कृषी विक्रेत्यांकडून करण्यात आले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संभ्रमात । वळेवर पडलेला पाऊस; लॉकडाऊनचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनााशिक : यावर्षी वेळेत पडलेला पाऊस, लॉकडाऊनमुळे काही कंपन्यांचे बंद असलेले प्लांट आणि रेल्वेची अडचणी आदी विविध कारणांमुळे जिल्ह्णात मागीलवर्षीपेक्षा अधिक युरिया उपलब्ध होऊनही त्याची टंचाई जाणवत असून, येत्या एक दोन दिवसांत युरियाबाबतची स्थिती सुधारेल शेतकऱ्यांनी आवश्यक तेवढ्याच गोण्या घ्याव्यात, असे आवाहन जिल्ह्णातील कृषी विक्रेत्यांकडून करण्यात आले आहे.मागीलवर्षी जिल्ह्णात जूनअखेरपर्यंत २१ हजार मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध झाला होता, तरीही युरियाची टंचाई जाणवत नव्हती. यावर्षी जूनअखेरपर्यंत ५८ हजार मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक साठा उपलब्ध होऊनही टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस लवकर झाल्याने पेरण्या लवकर पूर्ण झाल्या आहेत. शिवाय कोरोनाच्या संकटामुळे काही काळ रेल्वे वाहतूक बंद होती. शिवाय काही कंपन्यांचे प्लांटही बंद असल्यामुळे युरियाची मागणी आणि पुरवठा यामध्ये विस्कळीतपणा निर्मण झाला असल्याने युरियाची टंचाई जाणवत आहे. सध्या अनेक शेतकरी युरियासाठी गावोगाव फिरत आहेत. मध्यंतरी पाऊस बंद असल्याने शेतकºयांनी निंदणी-खुरपणीची कामे करून घेतली ही कामे होताच पावसाचे आगमन झाल्याने युरियाची मागणी वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. युरिया सर्वांत स्वत खत असल्यामुळे अनेक शेतकºयांचा पिकांना युरिया टाकण्याकडे ओढा असतो. यावर्षी जिल्ह्णात सर्वत्र एकाचवेळी पेरण्यापूर्ण झाल्यामुळे युरियाची मागणी वाढली आहे त्यातुलनेत पुरवठा कमी असल्यामुळे युरियाची थोडीफार टंचाई जानवते. मागील दोन दिवसांत नाशिकरोड आणि मनमाड येथे रॅक उपलब्ध झाल्या आहेत. अजून एखादी रॅक उपलब्ध झाली तरी परिस्थिती पूर्णपणे निवळेल.- संदीप शेटे, व्यवस्थापक, नाशिक तालुका शेतकी संघलॉकडाऊनमुळे मार्च, एप्रिल, मे महिन्यांत वेअरहाउसमध्ये मालाचा साठा होऊ शकला नाही. याशिवाय यावर्षी सर्वत्र एकाचवेळी पाऊस पडल्याने शेतकºयांची युरियासाठी झुंबड उडाली. त्यामुळे माल आल्यानंतर तो लगेच संपतो. तरीही प्रत्येक शेतकºयाला एक, दोन गोण्या देण्याचा प्रयत्न करत असतो. युरियाची टंचाई नाही. शेतकºयांनी घाबरून जाऊन एकाचवेळी गर्दी करू नये.- सुनील मालपाणी,खतविक्रेते, विंचूर, ता. निफाडतालुकानिहाय वितरीत झालेला युरिया (मे.टन)नाशिक ४४३०,त्र्यंबकेश्वर १३६६इगतपुरी २६३६पेठ १०३१सिन्नर २५९७निफाड ५६४४येवला ६३२८चांदवड ३२१२मालेगाव ७३५०सटाणा ६७५९नांदगाव ६४३९कळवण ४९९३दिंडोरी ३१२७देवळा ३६९३सुरगाणा ११५०

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती