शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

उर्दू शिकण्याकडे बिगर उर्दू भाषिकांचा नाशिकमध्ये वाढला कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 2:44 PM

उर्दू माध्यमाचे शिक्षण देणारी शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील जुने नाशिकमधील सारडा सर्क ल येथील यूज नॅशनल उर्दू हायस्कूल ही एकमेव जुनी संस्था म्हणून ओळखली जाते. एकूण शंभर प्रवेश अर्ज एका बॅचसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम शिकणा-या बाराव्या बॅचचा निकाल नुकताच जाहीर झाला.

ठळक मुद्दे ‘शायरी की जान उर्दू जुबान...’ असे म्हटले जाते अभ्यासक्रमाच्या १२व्या बॅचमधील अनिरुद्ध जाधव (८५टक्के) हे प्रथमकेंद्र सरकारचा उपक्रम‘उर्दू’ला मिळतोय ‘बूस्ट’

नाशिक : ‘शायरी की जान उर्दू जुबान...’ असे म्हटले जाते कारण उर्दूमधील गोडवा अन् नजाकत काहीशी हटकेच आहे. त्यामुळे उर्दूचे नेहमीच सर्वांना आकर्षण राहिले आहे. भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्या भाषेची ओळख सर्वप्रथम गरजेची असते. मागील बारा वर्षांपासून शहरात उर्दू भाषेचा पदविका अभ्यासक्रम सुरू असून, यामध्ये बिगर उर्दू भाषिकांचा टक्का अधिक वाढत आहे. नुकत्याच झालेल्या परीक्षेत ५८ विद्यार्थ्यांपैकी ५५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यामध्ये २३ टक्के बिगर उर्दू भाषिकांचा समावेश आहे.उर्दू माध्यमाचे शिक्षण देणारी शहरातील स्वातंत्र्यपूर्व काळातील जुने नाशिकमधील सारडा सर्क ल येथील यूज नॅशनल उर्दू हायस्कूल ही एकमेव जुनी संस्था म्हणून ओळखली जाते. एकूण शंभर प्रवेश अर्ज एका बॅचसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम शिकणा-या बाराव्या बॅचचा निकाल नुकताच जाहीर झाला. या बॅचमध्ये १०० विद्यार्थी होते; मात्र त्यापैकी ५८ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले व त्यामधून ५५ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहे. या अभ्यासक्रमाची १३वी बॅच सध्या सुरू असून, यामध्येही १०० विद्यार्थी उर्दूचे धडे गिरवित आहे. चौदाव्या बॅचची प्रवेशप्रक्रियाही पूर्ण झाली असून, १०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये ५४ विद्यार्थी बिगर उर्दू भाषिक आहे, अशी माहिती केंद्रप्रमुख लियाकत पठाण यांनी दिली.

केंद्र सरकारचा उपक्रमबारा वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत उर्दू पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. एक तपापासून अभ्यासक्रम अखंडितपणे चालविला जात आहे. सुरुवातीला काही बॅचमध्ये प्रवेशसंख्या कमी होती; मात्र या अभ्यासक्रमाचा प्रचार-प्रसार होताच प्रवेशसंख्या वाढली आहे.‘उर्दू’ला मिळतोय ‘बूस्ट’सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय परिषदेच्या माध्यमातून उर्दूच्या विकासासाठी पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत एक वर्षाचा उर्दू व दोन वर्षांचा अरेबिक पदविका अभ्यासक्रमाचे वर्ग जमीर पठाण व मौलाना युनूस खान हे घेतात. नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये २३ टक्के बिगर उर्दू भाषिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.अनिरुद्ध जाधव प्रथमउर्दू पदविका अभ्यासक्रमाच्या १२व्या बॅचमधील अनिरुद्ध जाधव (८५टक्के) हे प्रथम क्रमांकाने केंद्रामध्ये उत्तीर्ण झाले. त्यांनी १३००पैकी १११२ गुण मिळविले. अंबादास शेळके हे (८३टक्के) द्वितीय, तर निसार सय्यद यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

टॅग्स :NashikनाशिकMuslimमुस्लीमEducation Sectorशिक्षण क्षेत्र