नगरसेविकेचे पतीसह उपोेषण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:10 IST2021-07-09T04:10:17+5:302021-07-09T04:10:17+5:30
अत्यंत गाजावाजा करीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खेलो इंडिया खेलो उपक्रमांतर्गत राजे संभाजी स्टेडियममधील अंतर्गत विकासकामांचे मोठ्या ...

नगरसेविकेचे पतीसह उपोेषण आंदोलन
अत्यंत गाजावाजा करीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खेलो इंडिया खेलो उपक्रमांतर्गत राजे संभाजी स्टेडियममधील अंतर्गत विकासकामांचे मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले होते; परंतु संबंधित ठेकेदाराने जेमतेम काही महिने काम करीत यानंतर काम बंद केले. ते काम त्वरित सुरू करावे, यासाठी शिवसेनेच्या महिला नगरसेवक किरण दराडे व त्यांचे पती बाळा दराडे यांनी संभाजी स्टेडियमच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले. दरम्यान, दाम्पत्य उपोषणाला बसल्यानंतर खासदार हेमंत गोडसे यांच्यासह महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे, विभागीय अधिकारी संजय घुगे, उपअभियंता ए. जे. काझी यांसह अधिकारी उपस्थित झाले. बंद पडलेले काम सुरू करण्यासाठी येत्या आठ-दहा दिवसांत नव्याने निविदा काढून काम सुरू करणार असल्याचे शहर अभियंता घुगे यांनी उपोषणकर्त्यांना सांगितले. यानंतर दराडे दाम्पत्याने उपोषण मागे घेतले. (फोटो ०६ उपोषण)
फोटो ओळीं:
स्टेडियमच्या आवारात किरण दराडे व बाळा दराडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्याने त्या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेले खासदार हेमंत गोडसे, संजय घुगे, डॉ. मयूर पाटील, ए. जे. काझी आदी.