शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावर लवकरच अद्ययावत बसस्थानक: अनिल परब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 19:02 IST

राज्यात लवकरच प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक त्याठिकाणी नवीन बसस्थानक तयार करण्यात येणार आहेत. सप्तशृंगगडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन अद्यावत सुविधांयुक्त बसस्थानकाला प्राधान्य देणार असून, शासनस्तरावरून मंजुरी देणार असल्याची ग्वाही परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.

ठळक मुद्देपरिवहन मंत्र्यांच्या हस्ते काकड आरती

कळवण/पांडाणे : राज्यात लवकरच प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक त्याठिकाणी नवीन बसस्थानक तयार करण्यात येणार आहेत. सप्तशृंगगडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन अद्यावत सुविधांयुक्त बसस्थानकाला प्राधान्य देणार असून, शासनस्तरावरून मंजुरी देणार असल्याची ग्वाही परिवहनमंत्रीअनिल परब यांनी दिली.गडावर शनिवारी पहाटे ३ वाजता परब यांच्या हस्ते देवीची काकड आरती करण्यात आली. यावेळी अंधेरीचे नगरसेवक मनोहर पांचाळ, शहापूरचे कार्यकर्त चेतन वाघ उपस्थित होते. देवस्थानच्या कार्यालयात भेट घेऊन उपसरपंच राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांतर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत आदिमाया श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर दर्शनासाठी संपूर्ण भारतातून लाखो भाविक वर्षभरात हजेरी लावतात. देवीच्या दर्शनासाठी येणारे जास्तीत जास्त भाविक हे बसचा वापर करतात. सध्या असलेले बसस्थानक असून नसल्यासारखे असल्याने येथे भाविकांसाठी कोणत्याच सुविधा नसून भाविकांची व स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होते. सायंकाळी ६ नंतर येथून सुटणारी एकही बस नसल्याने बसच्या भरोशावर उशिराने आलेल्या भाविकांना रात्री मोठा आर्थिक भुर्दंड सहन करीत खासगी वाहनांनी प्रवास करावा लागतो. तसेच चैत्रोत्सव काळात धुळे, जळगाव, नंदुरबार, मध्य प्रदेश येथून लाखो भाविक पायी देवीच्या दर्शनासाठी येतात. दर्शन घेऊन बसने घरी परत जातात. त्यांचीही मोठी गैरसोय होते. त्यामुळे लवकरात लवकर येथे नवीन बसस्थानक तयार करावे, अशी मागणी होत आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके, तुषार बर्डे, प्रदीप कदम, राजेंद्र वाघ, प्रकाश कडवे, महेश पाटील, रमेश पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार नितीन पवार यांनीदेखील कळवण, सुरगाणा, सप्तशृंगगडावर सर्व सोयीसुविधांयुक्त बसस्थानक व परिसरात डांबरीकरण व नवीन बसेसची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावेळी तहसीलदार बंडू कापसे, न्यासाचे सुदर्शन दहातोंडे, भिकन वाबळे, परिवहन विभागाचे नाशिक प्रमुख अहिरे, संदीप बेनके, गिरीश गवळी, शांताराम सदगीर, राजू वाघ, प्रदीप कदम, प्रकाश कडवे, अजय दुबे, नारायण अंगोरे, महेश पाटील, रमेश पवार, तुषार बर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकministerमंत्रीAnil Parabअनिल परबsaptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिर