पायी यात्रा करीत उपाध्याय दाम्पत्य लासलगावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 18:43 IST2019-09-08T18:42:51+5:302019-09-08T18:43:51+5:30
लासलगाव : आईने बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी सर्व सोडून दिले व द्वारका ते तिरु पती व पंढरपुर पदयात्रा करीत आॅक्सफोर्ड यूनिवव्हर्सिटीत खगोल शास्त्रात पीएचडी केलेले भारत सरकारच्याच्या सेवेत त्यांनी आपले योगदान दिलेले डॉ. देव उपाध्याय व लंडन येथून मनोविकार शास्त्र या विषयात पीएचडी केलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. सरोज उपाध्याय यांनी रविवारी (दि.८) लासलगावी पोहचले.

द्वारका ते तिरु पती व पंढरपुर पदयात्रा करीत डॉ. देव उपाद्याय व सरोज उपद्याय लासलगावी दाखल झाले असता त्यांच्या समवेत संजय बिरार.
लासलगाव : आईने बोललेला नवस पूर्ण करण्यासाठी सर्व सोडून दिले व द्वारका ते तिरु पती व पंढरपुर पदयात्रा करीत आॅक्सफोर्ड यूनिवव्हर्सिटीत खगोल शास्त्रात पीएचडी केलेले भारत सरकारच्याच्या सेवेत त्यांनी आपले योगदान दिलेले डॉ. देव उपाध्याय व लंडन येथून मनोविकार शास्त्र या विषयात पीएचडी केलेल्या त्यांच्या पत्नी डॉ. सरोज उपाध्याय यांनी रविवारी (दि.८) लासलगावी पोहचले.
साधारण १ वर्षापूर्वी देव यांच्या दोन्ही डोळ्यांना दिसत नव्हते, त्यावेळी भरपूर इलाज करुन ही काही फरक पडत नव्हता. त्यावेळी त्यांच्या आईने कृष्ण मंदिरात नवस केला की मुलाचे डोळे चांगले झाले तर तो तिरु पती, पंढरपुर व परत द्वारका पदयात्रा करेल. आॅपरेशननंतर देव यांना दोन्ही डोळ्यांना दिसायला लागले संपूर्ण बरे झाल्यावर आईच्या श्रधेपोटी त्यांनी सर्व सोडून दिले व पदयात्रा सुरु केली. नवऱ्याच्या सोबतीला प्ती देखिल आल्याने या दोघांनीआइॅने बोललेला नवस पुर्ण केला. त्यादरम्यान उपाध्या दाम्पत्य आपल्या गावी द्वारका येथे परतत असताना ते रविवारी (दि.८) लासलगावी आले यावेळी येथील संजय बिरार यांनी त्यांची भेट घेतली असता ते नवस फेडण्याकरीता पायी फिरत असल्याचे समजले. डॉ. देव यांच्याशी चर्चा करताना ते खुप शिकल्याचे निदर्शनास आले. या विषयी बोलताना त्यांनी शिक्षण शिक्षणाच्या जागी आणि धर्म धर्माच्या जागी अगदी बरोबर असून आईच्या देवावरील श्रध्देमुळेच आम्ही हा नवस पुर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले, आणि या दोनच वाक्यातून त्यांनी आपल्या आई प्रति व आईचा आपल्या धर्मा प्रति असलेला विश्वास व्यक्त केला.