सिन्नरला विषय समित्यांची सभापती निवड बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 00:21 IST2020-01-22T23:11:06+5:302020-01-23T00:21:40+5:30
सिन्नर नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगरसेवकांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सभापती निवड व समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.

सिन्नर नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार राहुल कोताडे, नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे, हेमंत वाजे, शैलेश नाईक, सोमनाथ पावसे, विजय जाधव, बाळासाहेब उगले, सुजाता तेलंग, प्रमोद चोथवे, रुपेश मुठे, रोहित पगार, विजय वाजे आदी.
सिन्नर : नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतींची निवड बिनविरोध पार पडली. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नगरसेवकांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सभापती निवड व समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
तहसीलदार तथा पीठासन अधिकारी राहुल कोताडे यांच्या अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष किरण डगळे, उपनगराध्यक्ष गोविंद लोखंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या विषय समितींच्या निवडीसाठी सभापति- पदासाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. स्थायी समितीच्या सभापती ंंम्हणून नगराध्यक्ष किरण डगळे यांची पदसिद्ध सभापती म्हणून निवड करण्यात आली. सर्व नगरसेवकांसह उपमुख्याधिकारी रोहित पगार, नितीन परदेशी, विजय वाजे, जगदीश वांद्रे, गीतांजली मराडे, भूषण नवाळे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती
सभापती- रूपेश मुठे.
सदस्य- प्रतिभा नरोटे, ज्योती वामने, विजया बर्डे, निरूपमा शिंदे, शीतल कानडी, रामनाथ लोणारे.
आरोग्य रक्षण,
वैद्यकीय समिती
सभापती- गोविंद लोखंडे.
सदस्य- प्रणाली गोळेसर, गीता वरंदळ, निरूपमा शिंदे, विजय जाधव, चित्रा लोंढे, मालती भोळे.
पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती
सभापती- शैलेंद्र नाईक.
सदस्य- पंकज मोरे, प्रमोद चोथवे, नलिनी गाडे, हेमंत वाजे, मल्लू पाबळे, संतोष शिंदे.
नियोजन आणि विकास
सभापती- सोमनाथ पावसे.
सदस्य- ज्ञानेश्वर जाधव,
सुजाता भगत, मंगला शिंदे,
विजय जाधव, शीतल कानडी,
मालती भोळे.
महिला व बालकल्याण
सभापती- सुजाता तेलंग
सदस्य- मंगला शिंदे,
नलिनी गाडे, ज्योती वामने,
विजया बर्डे, प्रीती वायचळे,
अलका बोडके.
स्थायी समिती
सभापती- किरण डगळे
सदस्य- हेमंत वाजे, प्रमोद चोथवे, सुहास गोजरे यांच्यासह सर्व विषय समित्यांचे सभापती.
सार्वजनिक
बांधकाम समिती
सभापती- बाळासाहेब उगले.
सदस्य- ज्ञानेश्वर जाधव, प्रतिभा नरोटे, पंकज मोरे, सुजाता भगत, प्रीती वायचळे, वासंती देशमुख.