शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

तपोवनातील खुन प्रकरणाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश ; संशयित अटकेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 19:35 IST

नाशिकच्या तपोवन परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी ५० वर्षीय इसमाचा कोणीतरी अज्ञात संशयितांनी डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संशयित आरोपीने पलायन केले होते. या घटनेचा तपास करीत खुनाचे रहस्य उलगडले आहे. संशयितांना पोलिसांनी अटक केली असून पोलिसांनी केले तपासात दारूच्या नशेत शाब्दिक वादातून गोपालदास आश्रमात येणाऱ्या संतोष रामकृष्ण पवार याचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देखुनाचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश तपोवनातील खून प्रकरणात संशयिताल अटकेत

नाशिक : तपोवनात गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी ५० वर्षीय इसमाचा कोणीतरी अज्ञात संशयितांनी डोक्यात दगड टाकून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर संशयित आरोपीने पलायन केले होते. परंतु, पोलिसांनी या घटनेचा तपास करीत खुनाचे रहस्य उलगडले असून दारूच्या नशेत शाब्दिक वादातून गोपालदास आश्रमात येणाऱ्या संतोष रामकृष्ण पवार याचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.तपोवणात पाच दिवसांपूर्वी हिरावाडी परिसरात राहणाऱ्या पवारचा डोक्यात दगड घालून खून झाल्याची घटना घडली होती. या खून प्रकरणी चुंचाळे शिवारातील संजूनगर येथे रवि उर्फ पिंट्या तुकाराम लिलके याला आडगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पवार याचा खून कोणी व का केला याचे मुख्य कारण गुलदस्त्यात होते. तसेच  संशयित आरोपींना गजाआड करण्याचे आव्हानही पोलिसांसमोर उभे ठाकले होते. त्यामुळे या खुनाचा आडगाव पोलीस कसून तपास करीत असतांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक इरफान शेख यांना काही धागेदोरे मिळाले आणि त्यातून पिंट्या लिलके या संशयिताचे नाव पुढे आले. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. सी. तोडकर, उपनिरीक्षक धैर्यशिल घाडगे, पोलिस हवालदार राजाभाऊ गांगुर्डे, वाल्मिक सुर्यवंशी, योगेश घुगे, जगदीश पाटील आदींनी लिलकेला मुंबईनाका परिसरातून ताब्यात घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने दिलेल्या जबाबानुसार, सोमवारी रात्री पवार व लिलके दोघे दारू पिलेले होते. दारूच्या नशेत असलेल्या पवार याने लिलके याला फटका मारून तुझी माज्या बरोबर राहायची लायकी नाही, असे म्हणत वाद घातला होता. त्यामुळे संतापलेल्या लिलकेने राग अनावर झाल्याने पवारचा काटा काढायचे ठरविले व रात्री पवारच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकMurderखूनPoliceपोलिसArrestअटक