नाशिक : विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अनुदानाची तरतूद करण्यात यावी यांसह अन्य मागण्यांसाठी विनाअनुदानित कृती समितीच्या शिक्षकांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला असून, महाविद्यालयात ‘खडू, फळा बंद’ आंदोलन पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे २७ महाविद्यालयांमधील अडीच हजार शिक्षक सहभागी झाले आहेत.गेल्या काही वर्षांपासून विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालय कृती समितीच्या माध्यमातून शासनाकडे अनुदानासाठी पाठपुरावा केला जात आहे. शासनाकडून विनाअनुदानित तुकड्यांना अनुदान नसल्याने या तुकड्यांवरील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यासाठी सातत्याने आंदोलन सुरू असताना शासनाकडून प्रश्न सोडविण्याचे वारंवार आश्वासन देण्यात आले, मात्र अजूनही शासनाकडून निर्णय घेतला जात नसल्याने अखेर विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी ‘खडू,फळा बंद’ आंदोलन सुरू केले आहे.सदर आंदोलन सुरू करण्यापूर्वी गेल्या ५ तारखेला कृती समितीच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यात शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यानंतरही कृती समितीबरोबर कोणतीही चर्चा न केल्यामुळे अखेर शुक्रवारपासून बेमुदत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.विनाअनुदानित तुकड्यांवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या वेतनाबाबतचा प्रश्न अजूनही निकाली निघालेला नाही. संस्था पातळीवर याबाबत सकारात्मक भूमिका घेतली जात नसल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहेच शिवाय शासनाकडूनदेखील निर्णय होत नसल्यामुळे असे शिक्षक अडचणीत आले आहेत. आर्थिक विवंचनेत ज्ञानदानाचे कार्य करणाºया या शिक्षकांना इतर ठिकाणीदेखील काम करून आपल्या कुटुंबासाठी हातभार लावावा लागत आहे.अत्यंत तुटपुंजे वेतन तर काही शिक्षक केवळ वेतनाच्या अपेक्षेवर काम करीत असतानाही या शिक्षकांना अजूनही न्याय मिळू शकलेला नाही.
विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांत ‘खडू, फळा बंद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:27 IST
विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अनुदानाची तरतूद करण्यात यावी यांसह अन्य मागण्यांसाठी विनाअनुदानित कृती समितीच्या शिक्षकांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला असून, महाविद्यालयात ‘खडू, फळा बंद’ आंदोलन पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे २७ महाविद्यालयांमधील अडीच हजार शिक्षक सहभागी झाले आहेत.
विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांत ‘खडू, फळा बंद’
ठळक मुद्देबेमुदत उपोषण सुरू : जिल्ह्यातील अडीच हजार प्राध्यापक संपावर