शिंदेच्या सरपंचपदी बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:17 IST2021-02-16T04:17:16+5:302021-02-16T04:17:16+5:30

महिन्यापूर्वी झालेल्या शिंदे ग्रामपंचायत निवडणुकीत बाजार समिती संचालक संजय तुंगार यांचा धुरंधर पॅनल तर माजी सरपंच रतन ...

Unopposed election of Shinde as Sarpanch | शिंदेच्या सरपंचपदी बिनविरोध निवड

शिंदेच्या सरपंचपदी बिनविरोध निवड

महिन्यापूर्वी झालेल्या शिंदे ग्रामपंचायत निवडणुकीत बाजार समिती संचालक संजय तुंगार यांचा धुरंधर पॅनल तर माजी सरपंच रतन जाधव यांच्या ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ लढत झाली. त्यात जाधव यांच्या पॅनलने १७ पैकी १४ जागा जिंकून घवघवीत यश मिळविले, तर तुंगार यांच्या पॅनलला तीन जागांवर समाधान मानावे लागले. निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत घोडके यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दुपारी झालेल्या सरपंचपदासाठी गोरख जाधव व उपसरपंचपदासाठी गणपत जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे घोषित करण्यात आले. बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक बोराडे, बाजीराव जाधव, ज्ञानेश्वर जाधव, भाऊराव धुळे, वंदना जाधव, अनिता तुंगार, हिराबाई जाधव, शालिनी तुंगार, संगीता बोराडे, सुप्रिया तुंगार, अर्चना जाधव, अश्विनी साळवे, तानाजी जाधव, नितीन जाधव, रिना मते, रतन जाधव, रामदास तुंगार, कैलास भांगरे, ज्ञानेश्वर मते, मोतीराम जाधव, विजय साबळे, सुदाम जाधव आदी उपस्थित होते. (फोटो १५ शिंदे)

Web Title: Unopposed election of Shinde as Sarpanch