वाहनाच्या धडकेने अज्ञात इसम ठार
By Admin | Updated: November 23, 2015 23:59 IST2015-11-23T23:58:56+5:302015-11-23T23:59:23+5:30
वाहनाच्या धडकेने अज्ञात इसम ठार

वाहनाच्या धडकेने अज्ञात इसम ठार
पंचवटी : आडगाव शिवारातील सुखमणी लॉन्ससमोरील रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अज्ञात इसम ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताबाबत अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रविवारी पहाटेच्या सुमाराला हा अपघात घडला. सुखमणी लॉन्ससमोरील सदर इसम रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने त्याला धडक दिली. या अपघातानंतर पोलिसांना माहिती मिळताच त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते; मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. ठार झालेल्या इसमाची ओळख पटलेली नाही. अपघातानंतर पलायन केलेल्या वाहनचालकाविरुद्ध आडगाव पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (वार्ताहर)