शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विद्यापीठ उपकेंद्राला लवकरच स्वतंत्र इमारत मिळणार : प्रशांत टोपे

By नामदेव भोर | Updated: January 19, 2019 22:49 IST

गेल्या अनेक दिवसांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचा प्रश्न प्रलंबित आहे. विद्यापीठास उपकेंद्रासाठी जागा मिळाली असली तरी उपकेंद्र उभारणीसाठी कोणताही निधी प्राप्त झालेला नाही. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यासाठी येथील उपकेंद्र कार्यालयाला निर्णयक्षम अधिकारीच नसल्याने ही प्रक्रिया रखडली होती. परंतु, विद्यापीठ उपकेंद्राला समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांच्या रूपाने नवीन अधिकारी लाभला आहे. त्यांनी उपकेंद्राचा कार्यभार स्वीकारताच येथे उपकेंद्राचा कायापालट करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, उपकेंद्राच्या विविध समस्या व आव्हानांसोबतच विद्यापीठाच्या स्वत:च्या इमारतीचे काय होणार आणि तोपर्यंतचा प्रवास कसा असणार याविषयी उपकेंद्र समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांच्याशी साधलेला संवाद.

नाशिक : गेल्या अनेक दिवसांपासून सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचा प्रश्न प्रलंबित आहे. विद्यापीठास उपकेंद्रासाठी जागा मिळाली असली तरी उपकेंद्र उभारणीसाठी कोणताही निधी प्राप्त झालेला नाही. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्यासाठी येथील उपकेंद्र कार्यालयाला निर्णयक्षम अधिकारीच नसल्याने ही प्रक्रिया रखडली होती. परंतु, विद्यापीठ उपकेंद्राला समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांच्या रूपाने नवीन अधिकारी लाभला आहे. त्यांनी उपकेंद्राचा कार्यभार स्वीकारताच येथे उपकेंद्राचा कायापालट करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, उपकेंद्राच्या विविध समस्या व आव्हानांसोबतच विद्यापीठाच्या स्वत:च्या इमारतीचे काय होणार आणि तोपर्यंतचा प्रवास कसा असणार याविषयी उपकेंद्र समन्वयक डॉ. प्रशांत टोपे यांच्याशी साधलेला संवाद.प्रश्न - जवळपास दोन वर्षांपासून नाशिक उपकेंद्राला निर्णयक्षम अधिकारी नाही, त्यामुळे आपण पदभार स्वीकारल्यानंतर येथील कोणत्या समस्या प्रकर्षाने जाणवल्या?टोपे - नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यार्थी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जोडणारे उपकेंद्र हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे येथे पूर्णवेळ निर्णयक्षम अधिकारी आवश्यक आहे. समन्वयकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर येथे सुरू असलेले व्यवस्थापन शास्त्र अभ्यासक्रमासोबत ई-लायब्ररी आणि अन्य उपक्रम प्रभावीपणे चालविण्याचे आव्हान होते. त्यासाठी प्रथम कार्यालयीन व्यवस्थापनात सुधारणा करून विद्यापीठाचे उपक्रम नियमित सुरू केले आहेत. 

प्रश्न- विद्यापीठ उपकेंद्र इमारतीचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यात काय प्रगती झाली आहे. टोपे - उपकेंद्र समन्वयक म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम उपकेंद्राच्या जागेचा प्रश्नच समोर आला. येथे सुरू असलेल्या उपक्रमांसोबत आणखी काही नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. परंतु, जागेअभावी ते शक्य नाही. त्यामुळे सिडकोतील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ६८ च्या जागेसाठी विद्यापाठीतर्फे प्रस्ताव सादर करण्यात आला असून, वार्षिक भाड्यापोटी १३ लाख रुपये देण्याची तयारी विद्यापीठाने दर्शविली आहे. त्याविषयी लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. 

प्रश्न - उपकेंद्रासाठी शिवनई येथील जागा उपलब्ध झाली असताना महापालिकेच्या शाळेच्या जागेसाठी विद्यापीठ आग्रही का आहे?टोपे - शिवनई येथील जागेवर इमारत उभारणीसाठी स्थानिकांचे अपेक्षित सहकार्य लाभत नसल्याने इमारत उभारणीसाठी अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे. शिवाय सध्याच्या जागेवर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असल्याने अधिक वर्दळ असते. त्यामुळे उपकेंद्राला काही समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या टाळण्यासाठी उपकेंद्राला स्वतंत्र इमारतीची आवश्यकता आहे. प्रश्न - विद्यापीठ उपकेंद्र नव्या जागेत कधीपर्यंत सुरू होऊ शकेल? टोपे - पुढील शैक्षणिक वर्षात विद्यापीठ उपकेंद्र नवीन जागेत स्थलांतरित होऊ शके ल. ही नवीन जागा जवळपास एक एकरची असून, स्वतंत्र इमारत असल्याने उपकेंद्रासाठी प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे. येथे सध्या सुरू असलेल्या अभ्यासक्रमांसोबतच विद्यापीठाला आणखी काही नवीन अभ्यासक्रम सुरू करणे शक्य होईल. 

मुलाखत - नामदेव भोर 

टॅग्स :Educationशिक्षणuniversityविद्यापीठStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र